स्वयंसिद्ध लेखमाला:-
स्त्री चे आरोग्य:-
संकलन:-डीडिनेटवर्क.
स्त्री आरोग्याच्या संदर्भात, स्त्रियांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी संबंधित विविध समस्या, तसेच त्यांच्या लैंगिक आरोग्याशी संबंधित असणाऱ्या समस्यांचा विचार करणे आवश्यक आहे.
स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे:
स्त्रीरोग:
मासिक पाळी, गर्भधारणा, प्रसूती आणि रजोनिवृत्ती यांसारख्या प्रक्रियेवर लक्ष देणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्य:
नैराश्य, चिंता आणि इतर मानसिक समस्या स्त्रियांमध्ये सामान्यतः आढळतात, त्यामुळे मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सामान्य आरोग्य समस्या:
हृदयविकार, कर्करोग, मधुमेह आणि इतर सामान्य आरोग्य समस्या स्त्रियांमध्ये कसे प्रकट होतात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आरोग्य शिक्षण:
स्त्रियांच्या आरोग्याबद्दल माहिती मिळवणे आणि योग्य आरोग्य सेवांचा लाभ घेणे महत्त्वाचे आहे. सामाजिक-सांस्कृतिक घटक:
सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांचा स्त्रियांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो याचा विचार करणे आवश्यक आहे. आरोग्य सेवा:
स्त्रियांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या आरोग्य सेवांची उपलब्धता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. स्त्रीरोगतज्ञ (OB/GYN):
गर्भधारणेदरम्यान आणि बाळंतपणादरम्यान महिलांची काळजी घेण्यात आणि महिला पुनरुत्पादक अवयवांच्या आजारांचे निदान आणि उपचार करण्यात विशेषज्ञता असलेली वैद्यकशास्त्राची एक शाखा. कौटुंबिक जबाबदारी यामुळे बऱ्याच स्त्रिया स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. याशिवाय चुकीचा आहार, मानसिक ताणतणाव, बैठी जीवनशैली यामुळे महिलांमध्ये आरोग्याच्या विविध समस्या होत असल्याचे दिसून येते। स्त्रियांमध्ये मासिक पाळी, गर्भावस्था, मेनोपॉज, (रोजोनिवृती) अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर काही आरोग्याच्या तक्रारी होत असतात. ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशय मुखाचा कर्करोग यासारख्या कॅन्सरचे प्रमाणही स्त्रियांमध्ये अधिक आहे. पुरुषांच्यामानाने स्त्रीयांमध्ये पित्ताशयातील खडे, अर्धशिशी (Migraine), संधिवात, अनीमिया, मुत्राशयाचा संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आहे.
कोणत्या रोगांविषयी स्त्रीयांनी विशेष दक्ष रहावे?
तसे पाहता आजार होऊ नये म्हणूनच आरोग्यकडे लक्ष दिले पाहिजे, परंतु स्तनाचा कैन्सर, सर्वायकल कँसर, हृद्यविकार, डिम्बग्रंथीचा कैन्सर, मलाशयाचा कैन्सर, मधुमेह, उच्चरक्तदाब, अस्थिपोकळ होणे (Osteoporosis) हे रोग अत्यंत कमी लक्षणे जाणवतात आणि हे रोग कधी गंभीर होऊन मृत्युस कारण ठरतात हे कळत नाही. शरीरात छुप्या स्वरुपात राहत असल्यामुळे या रोगांना ‘Silent killer diseases' असे म्हणतात. या छुप्या स्वरुपातील रोगांपासून रक्षण करण्यासाठी दक्ष असावे लागते. वरील रोग नसल्याची खात्री वैद्यकिय तपासणींच्याद्वारे वेळोवेळी करुन घेणे गरजेचे असते.
स्त्रीयांना आजार होण्याची प्रमुख कारणे :-
👉🏽 पोषणतत्वरहित आहाराचे सेवन करणे.
👉🏽 हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, विविध ताजी फळे यांचे अपुऱ्या सेवनाने.
👉🏽 अधिक तेलकट पदार्थ, चरबीयुक्त पदार्थांच्या सेवन केल्याने.
👉🏽 चहा, कॉफी यांच्या अतिरेकामुळे विकारांची उत्पत्ती होते.
👉🏽 शारीरिक श्रमाचा अभाव, बैठी जीवनपद्धत्तीमुळे व मानसिक ताणतणावामुळे.
👉🏽 सौंदर्यासंबंधीच्या चुकिच्या संकल्पनेमुळे.
👉🏽 उशिरा होणारी लग्ने, आज मुलींत तिशीच्या आसपास लग्न करण्याचे प्रमाण वाढले आहे. म्हणजेच वयात आल्यापासून लग्न होईपर्यंतचा टप्पा चांगलाच लांबला आहे. या कालावधीत महिलांना आरोग्याशी संबंधित विविध बाबींना तोंड द्यावे लागते. वैद्यकीय कारणांनुसार 20 ते 30 वर्ष हे वय प्रसूतीसाठी योग्य असते.
👉🏽 आरोग्याच्या पायाभूत महितीअभावी डॉक्टरांच्या सुचनेशीवाय घेतलेल्या गर्भनिरोधक गोळ्यांच्या अतिवापरामुळे स्त्रीयांमध्ये प्रामुख्याने विविध विकारांची उत्पत्ती होते.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा .
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️
Comments
Post a Comment