पॉवरफुल बिझनेस वूमन " ( सामर्थ्यवान उद्यमशील महिला)सौ.नयन निलेश चव्हाण!

"पॉवरफुल बिझनेस वूमन " ( सामर्थ्यवान उद्यमशील महिला)या पुरस्काराने सन्मानित होणार सौ.नयन निलेश चव्हाण!



पुणे, डीडीन्यूजब्यूरो 

     जागृत ग्राहक राजा संस्थेच्या राज्य उपाध्यक्षा सौ.नयन निलेश चव्हाण यांना नवी दिल्ली येथील  कॅट संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून influence of the year 2025  " पॉवरफुल बिझनेस वूमन " ( सामर्थ्यवान उद्यमशील महिला ") हा पुरस्कार  जाहीर झाला आहे.

 💐💐हार्दिक अभिनंदन 💐💐

     त्या मूळच्या हर्णे (दापोली ) येथील माजी सरपंच असून सध्या पुणे येथे अनुलोम सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहेत.यापूर्वी त्यांनी प्रतिभा नारी परिवर्तन संस्था,लोकमंगल सेवा सोसायटी,सत्य महिला पोलिस टाईम्स ,पत्रकार महिला सेवा संघ यावर काम केले आहे.तसेच वृत्त पत्रातून महिला समस्या,बचत गट यावर विपुल लेखन केले आहे.या पूर्वी त्यांना रणरागिणी व साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

    आज स्व.बाळासाहेब ठाकरे कला दालन,पुणे येथे जागतिक महिला दिन कार्यक्रमात कॅट च्या वतीने पोलिस उपा युक्त स्मार्तना पाटील,लेखिका प्रा.वसुंधरा काशीकर, जागृत ग्राहक राजा चे अध्यक्ष दिलीप फडके, इतिहास तज्ञ गणेश घळपे , कॅट चे राज्य अध्यक्ष सचिन निवंगुणे,रंजना एरोनकर व सुजाता शहा या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात येणार आहे.

त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने जागृत ग्राहक राजा या सामाजिक संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे सर्वत्र प्रसारीत होण्यास मदतच मिळणार असल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सौ.नयन चव्हाण यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत, तसेच  याबद्दल  विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️

 

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.