वाशिम ग्राहक तक्रार निवारण आयोगातील प्रसाधनगृहाचे हाल बेहाल!!
वाशिम जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगातील प्रसाधनगृहाचे हाल- बेहाल!
वाशिम,डीडिन्यूजब्यूरो.
वाशिम जिल्हा ग्राहक आयोगाच्या इमारतीत पुरुष व महिला अधिकारी वर्ग, कर्मचारी, अधिवक्ता, पक्षकार यांचे करिता प्रसाधन गृहाची कुठलीच व्यवस्था नाही,तर ग्राहक आयोगाच्या अध्यक्षपदी महिला अध्यक्षा असून त्यांचे केबिनमध्ये एक स्वच्छता गृह आहे मात्र ते फक्त दिखाव्यासाठीच असून या प्रसाधन गृहाला दरवाजाच नाही, परिणामी त्या स्वच्छता गृहाला कापडी पडदा लावला आहे त्यामुळे ते असूनही त्याचा वापर करता येत नाही.
या परिसरात प्रसाधनाची इतर कोणतीही व्यवस्था नाही, त्यामुळे पुरुष वर्ग चक्क उघड्यावर जातो मात्र याकडे प्रशासनाचे अजिबात लक्ष नाही, आणि महिलांची तर कुचंबणा होते आहे आणि तरीही ही बाब कुणीही गंभीरपणे घेत नाही.
प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत याबाबत ग्राहक आयोगाच्या वतीने मान.जिल्हाधिकारी व माननीय पोलिस अधीक्षक यांना आतापर्यंत दोन वेळा निवेदन पत्र देऊन झाले आहेत मात्र कोणत्याही खात्याकडून अजूनपर्यंत काहीही प्रतिसाद नाही.
वाशिम जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय,अथवा पोलिस अधीक्षक कार्यालयाचे वतीने या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर लक्ष वेधले गेले नाही तर , ग्राहकांना आपल्या अधिकारांप्रती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अथवा मुख्यमंत्री यांचेकडे तक्रार करण्याची वेळ येते की काय?असा प्रश्न वाशिम जिल्ह्यातील काही ग्राहकांनी जागृत ग्राहक राजा या सामाजिक ग्राहक संघटनेचे विदर्भ प्रांत प्रभारी दीपक देशपांडे यांचेशी संपर्क साधून उपस्थित केला आहे.
प्रशासकीय यंत्रणा याबाबत तातडीने दखल घेऊन कारवाई करेल काय? अन्यथा जागृत ग्राहक राजा आपल्या ग्राहकांच्या हक्कासाठी एक लढा वाशिम येथे उभारेल मात्र १५मार्च जागतिक ग्राहक हक्क दिनापर्यंत हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन नक्कीच ठोस उपाययोजना करेल,अशी अपेक्षा दीपक देशपांडे यांनी व्यक्त केली आहे.
दीपक देशपांडे, ✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment