सार्वजनिक ठिकाणचे झाडं तोडताय, सावधान!

 सार्वजनिक ठिकाणचे झाडं तोडताय, सावधान! 


मूल, दीपक देशपांडे 

नगर परिषद मूल क्षेत्रातील वार्ड क्र. १४ मधील बिएसएनएल रोड ते आदिवासी मूलांचे वस्तीगृह मार्गावरील सागर प्रकाश वट्टमवार वार्ड क्र. १४ रा. मूल हे  आपल्या मालकीचे घरासमोरील कडूनिंबाचे झाड उंची १५ ते २० फूट वय अंदाजे १० ते १५ वर्ष असलेले वृक्षतोड करीत असल्याची तकार भ्रमनध्वनी संदेशावर प्राप्त होताच त्वरीत श्री. संदीप दोडे मूख्याधिकारी नगर परिषद मूल हे आपल्या कार्यालयीन पथकासह  मौक्यावर हजर झाले. त्यावेळी सागर प्रकाश वट्टमवार हे मजूराद्वारे कडूनिंबाचे झाड तोडत असल्याचे प्रत्यक्ष निदर्शनात येताच वृक्षतोड करण्याकरीता वापर करण्यात येणाऱ्या २ कू-हाडी व एक शिडी जप्त केली.

महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ मधील कलम २१ (१) तरतूदींचे उल्लंघन केल्याने त्यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सूरु आहे.
सदर अधिनियमाचे उल्लंघन करुन जी कोणतीही व्यक्ती कोणतेही झाड तोडील किंवा कोणतेही झाड तोडण्यास कारणीभूत होईल किंवा वृक्ष अधिका-याने किंवा वृक्ष प्राधिकरणाने लादलेल्या शर्तीचे किंवा दिलेल्या आदेशांचे पालन करण्यात वाजवी सबबीशिवाय कसूर करील किंवा वृक्ष प्राधिकरणाच्या कोणत्याही सदस्यास किंवा वृक्ष अधिका-यास किंवा त्याला दूय्यम असलेल्या कोणत्याही अधिका-यास किंवा कर्मचा-यास या अधिनियमाखालील त्यांची कर्तव्ये पार पाडण्यात स्वेच्छेने अडथळा आणील त्या व्यक्तीला अपराध सिध्दीनंतर, प्रत्येक अपराधाकरीता प्रती वृक्षास १,००,०००/- रुपये पर्यंत दंड मर्यादीत आहे. व इतक्या द्रवदंडाची आणि एक आठवड्यापेक्षा कमी नसेल व एक वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या कारावासाची देखील शिक्षा होईल अशी तरतूद नमूद आहे. तरी नगर परिषद मूल क्षेत्रातील नागरीकांनी वृक्ष लागवड व वृक्षांचे संवर्धन करुन जास्तीत जास्त वृक्षांची जोपासणा करावी. कोणत्याही व्यक्तीने वृक्षतोड करुन अधिनियमाचे उल्लंघन करु नये असे आवाहन श्री. संदीप दोडे मूख्याधिकारी नगर परिषद मूल यांनी केले आहे.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

✍️Ddbatmiportalm2m✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.