प्रथम तुला वंदितो......! स्वयंसिद्ध लेखमाला!

   प्रथम तुला वंदितो......!

जागतिक महिला         दिनानिमित्त कविता 









आमच्या या उपक्रमाला  सुरुवात करताना एका छान कवितेने ती व्हावी , आणि आमच्या हितचिंतक वाचकांना वाचनाची मेजवानी मिळावी आणि  महिलांना लेखनासाठी व्यासपीठ ,हा एकमेव हेतू समोर ठेवून आम्ही आपल्या या स्वयंसिद्ध लेखमालेचा शुभारंभ करीत आहोत.

दीपक देशपांडे, मुख्य संपादक.

               "स्त्री शक्ती"

स्त्री शक्तीचे गुज सांगते सखये तुझ्या कानात 

शक्ती बुद्धी भक्ती अंतरी हीच मूर्ती मनामनात 


पराक्रमाची ढाल तू उबदार मायेची शाल तू 

दयेचा सागर तू अवकाशीची पोकळी तू


समाधानाचे शिखर तू शांतीची उत्पत्ती तू 

परोपकाराची देवता तू अन्यायाची शत्रू तू


आनंदाची भरती तू स्वर्ग सुखाची लहर तू 

विविध गुणांनी नटलेली निसर्गाची देण तू 


साकारलेली अशीच प्रतिमा ठसली माझ्या मनी 

त्रिवार वंदन तुला अर्पिते मातृ शक्तीच्या मंगलदिनी 


गाऊ दे  अशीच महती अखंड जाऊ दे बुडुनी 

सन्मानाचा हिरा कोंडोनी  ठेवते माझ्या हृदय कोंदणी 

सौ चित्रा चौधरी ,

सिद्धिविनायक नगर ,

वि.म.वि. अमरावती 4 

मो.9890967003


दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.