गट विकास अधिकारी अचानक शाळेला भेट देतात तेव्हा....
गट विकास अधिकारी अचानक शाळेला भेट देतात तेव्हा....
मूल : दीपक देशपांडे
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बी.एच. राठोड यांनी दि. १ मार्च २०२५ रोजी सकाळी ८ वाजता मूल तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा गांगलवाडी येथील शाळेला भेट दिली.शाळेची मुले खाली चटईवर बसून अभ्यास करीत असताना स्वतः गट विकास अधिकारी सुद्धा मुलांसोबत खाली बसले आणि चिमुकल्या मुलांची अभ्यासाबाबत विचारपूस केली. प्रत्यक्ष अक्षर लेखन व वाचन घेतले व मुलांच्या हुशारी बाबत त्यांचे कौतुकही केले. शाळेतील मुलांचा शैक्षणिक दर्जा पाहून आनंद व समाधान व्यक्त केला. आज आनंददायी शनिवार ( दप्तरमुक्त (शाळा) असताना विद्यार्थी शैक्षणिक साहित्याचा वापर करून शिकत आहेत हे बघून शाळेचेही कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन दर्जेदार शिक्षण देण्याचे शैक्षणिक कार्य शाळेत सुरू आहे. हे बघून पुढील वाट चालीसाठी उपस्थित सर्व मुले अतिशय गरिबीतून ग्रामीण भागातून शिक्षण घेत असल्याने त्यांच्या वागणुकीबद्दल अभिनंदन केले. शिस्तीबद्दल भरभरून शुभेच्छा दिल्या. शाळेला व शिक्षकांनाही शुभेच्छा दिल्या. तालुक्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील लहान मुलांना प्रत्यक्ष भेटी देऊन लहान मुलांच्या शिक्षणा बाबत विचारपुर व चर्चा करणारे पहिले गटविकास अधिकारी बी. एच. राठोड असल्याची चर्चा पंचायत समिती परिसरात केली जात आहे.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment