होळी-रंगपंचमी आणि पदवीप्रदान समारंभ!
होळी, रंगपंचमी आणि पदवीप्रदान समारंभ!
बुरा ना मानो....होली है||
दीपक देशपांडे
गुरुवारी रात्री उशिरापर्यंत आमच्या हितचिंतकांकडून आलेल्या मागणीनुसार आमच्या वेबसाईटवर, ब्लॉग वर पदवीप्रदान समारंभ आयोजित करण्यात आल्याची सूचना न आल्याने तो यावेळी सोडून देण्याचा विचार तर आम्ही केला नाही अशी विचारणा झाली आणि खास लोकाग्रहास्तव पुनश्च एकदा शुक्रवारी दूपारी १२वाजता पदवीप्रदान समारंभ निश्चित करण्यात आला आहे.
या पदवीप्रदान समारंभाचे उद्घाटन भरदूपारी आपापल्या हातातील मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हालाच करायचे असून त्यासाठी आम्ही मुहूर्त बरोबर १२चा ठरविलेला आहे.
या समारंभात सहभागी व्हायला विसरु नका, आम्ही पदव्यांच्या गुंडाळ्या बरोबर बारा वाजता तुमच्या हातात देणार आहोत... तेंव्हा .....
Be Ready....be happy, & enjoy the festival of colours with natural resources.
रंगांची उधळण मुक्तहस्ते होऊ द्या, गुलालाच्या रंगाची छटा तुमच्या आयुष्यात उतरु द्या, मनसोक्तपणे वडा आणि पुरणपोळीचा आस्वाद घ्या.
आमच्या तर्फे तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला होळीच्या आणि रंगोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.
✍️Ddbatmi@m2M✍️



Comments
Post a Comment