रासेयो स्वयंसेवकांमार्फत पक्षांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्थेबाबत जागरुकता
रासेयो स्वयंसेवकांमार्फत पक्षांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्थेबाबत जागरुकता
मूल २० जुलै: दीपक देशपांडे.
राष्ट्रीय सेवा योजना, कृषी महाविद्यालय मूल अंतर्गत पक्षांना पिण्याचे पाणी यांच्या व्यवस्थेबाबत जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत सर्वप्रथम कृषी महाविद्यालयाचे *सहयोगी अधिष्ठाता डॉ विष्णुकांत टेकाळे* व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी *श्री नागेश नवघरे* व इतर प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजना *स्वयंसेवक* यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या परिसरात पाण्याच्या परड्या (मातीचे भांडे )झाडावर बांधण्यात आल्या. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हे पर्यावरण संवर्धन असून यामध्ये नुकत्याच सुरू झालेल्या उन्हाळ्यामध्ये पक्षांना पिण्याचे पाणी मिळावे व आपल्या पर्यावरणात आपल्या सभोवताल पक्षी आनंदाने राहावे हा होय, कारण पक्षी माणसाप्रमाणे कोणालाही पाणी मागत नाहीत किंवा कुठे जाऊन खरेदी ही करू शकत नाहीत. या जिल्ह्यात उन्हाळा हा मोठ्या प्रमाणात तापतो व पक्षांना पुरेसं पिण्याचं पाणी मिळावे. ज्या व्यक्तीस, युवक, युवती, महिला, विद्यार्थी व इतर नागरिक यांना शक्य आहे त्यांनी आपल्या घर परिसरात किंवा सार्वजनिक ठिकाणी पक्षांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी असा संदेश राष्ट्रीय सेवा योजना *स्वयंसेवकांमार्फत* देण्यात आला.
या कार्यक्रमांतर्गत स्वामी विवेकानंद शाळा परिसर, तहसील कार्यालय येथे *श्री कुमरे* सर नायब तहसीलदार यांच्या हस्ते तर पंचायत समिती मुल येथे गट विकास अधिकारी *श्री. बी एच राठोड* सर व इतर कर्मचारी वृंद यांच्या हस्ते पक्षांना पिण्याची पाण्याचे पारडे बांधून त्यामध्ये पाणी ठेवण्यात आले. याशिवाय राष्ट्रीय सेवा योजनेच्या *स्वयंसेवकांमार्फत* मुल येथील अनेक सार्वजनिक ठिकाणी जसे कपडा बाजार व इतर ठिकाणी पक्षांना पिण्याच्या पाण्याच्या पारड्या (मातीचे भांडे) बांधून पाण्याची व्यवस्था करण्यात आली. सदर जनजागृकता कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्याकरिता महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व प्राध्यापक *डॉ अक्षय इंगोले* तसेच इतर प्राध्यापकवृंद व राष्ट्रीय सेवा योजनेचे *स्वयंसेवक* यांनी मोलाची भूमिका बजावली.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

Comments
Post a Comment