स्वयंसिद्ध लेखमाला:-६.समाज परिवर्तनाच्या वाटेवरचे हे एक पहिले पाऊल ठरावे.
स्वयंसिद्ध लेखमाला:-६
८मार्च:- समाज परिवर्तनाच्या वाटेवरचे हे एक पहिले पाऊल ठरावे.
शैला शिळीमकर , पुणे.
८ मार्च जागतिक दिना निमित्ताने महिला जागर महिलांविषयी आदर सन्मान प्रेम व्यक्त करणे १९१० मध्ये आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार ८मार्च हा दिवस जागतिक महिलादिन म्हणून निश्चित करण्यात आला या दिवशी कर्तृत्ववाण महिलांचा सत्कार करण्यात येतो .
स्त्री जर सुशिक्षित झाली तर कुटुंब रचना गाव देश बदलण्याचे सामर्थ्य तिच्या मध्ये असते .स्त्री शक्तीचा महिमा अपरंपार असतो .
आदिशक्ती संस्कार कर्तव्य ,माणुसकीचा झरा
आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू
झाशीची राणी तू
मावळ्यांची भवानी तू
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू
आजच्या युगाची प्रगती तू
नारी ही शक्ती आहे नराची
नारी हीच शोभा घराची
हिंदवी स्वराज्याची पेरणा दिली जिजाऊनी
शिक्षणाची दारे खुली करून दिली सावित्री बाई फुले यांनी
इंग्रजांना ठणकावून सांगणारी मेरी झाशी नहीं दुंगी म्हणणारी झाशीची राणी लक्ष्मी बाई अहिल्याबाई होळकर खूप कर्तत्ववान महिला होऊन गेल्या त्यांचा आदर्श घेत इंदिरा गांधी प्रतिभाताई पाटील ,सुनीता विल्यम्स ,पी टी उषा यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात भरारी घेत आदर्श ठेवला पण आता तरी महिला सुरक्षित आहे का?
महिला बस स्थानक, शाळा, कामाच्या ठिकाणी , अत्याचार , बलात्कार , छेड छाड अशा अनेक समस्यांनी तिचे जीवन घेरले आहे .वर्तमानपत्र चाळले तरी तेच , दूरदर्शन वरील बातम्यातही तेच ! ऐकून -वाचून अंगावर काटा उभा राहतो.
त्यामुळे असे वाटते की आज तरी स्त्री सुरक्षित आहे काय? तिची तिनेच काळजी घेतली पाहिजे,हे जरी खरे असले तरी, समाजाने फक्त महिलांना दीनदुबळी न समजता आणि केवळ ८ मार्च हाच फक्त महिलादिन न मानता प्रत्येक दिवस हा महिला दिन समजावा आणि त्यानुसार आचरणात बदल घडवून आणावा, आणि समाज परिवर्तनाच्या वाटेवरचे हे एक पहिले पाऊल ठरावे. हीच आजच्या दिवशी, मनोकामना
सगळ्या महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा.
जय जिजाऊ जय शिवराय .
शैला शिळीमकर, पुणे.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment