स्वयंसिद्ध लेखमाला:- १४,नर और नारी एक समान .

स्वयंसिद्ध लेखमाला:- १४

नर और नारी एक समान.

स्त्री गर्भातूनच मनुष्याची उत्पत्ती होते. बालकाची आदी गुरु त्याची माताच असते. पित्याच्या वीर्या चा एक थेंब निमित्य मात्र ठरतो उर्वरित बालकाचे समस्त अंग प्रत्यांग मातेच्या रक्तानेच बनतात. त्या रक्तात ज्या मात्रेत स्वस्थता, प्रतिभा, विचारधारा, अनुभूती असेल त्यानुसारच बालकाचे शरीर,मस्तक आणि स्वभाव बनतो. स्त्री जर अस्वस्थ, अशिक्षित ,अविकसित ,पराधीन, कुपमंडूक आणि हिन दीन असेल तर तिच्याद्वारे उत्पन्न बालक याच दोषांनी युक्त असेल. म्हणतात ना ...उसर खेत मे अच्छी फसल उत्पन्न नही हो सकती.

जर मनुष्य जातीची प्रगती व्हावयाची असेल तर सर्वप्रथम स्त्रियांना शारीरिक बौद्धिक सामाजिक आर्थिक सर्व अंगांनी महत्त्वपूर्ण आणि सुविकसित करणे आवश्यक आहे कारण तसे केल्यासच मनुष्यात सुलभता ,सक्षमता ,सद्बुद्धी, सदगुण आणि महानतेचे संस्कार उदयान्वित होऊ शकतील .

या अनुषंगानेच यंदाची महिला दिनाची थीम आहे accelarate action for women empowerment...

एक्सेलरेट ॲक्शन फॉर वुमन एम्पॉवरमेंट 

स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाला गती देणे 

कारण 

 नारीका सन्मान जहाँ संस्कृती का उत्थान वहा 

मनुष्याचा व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिकच नव्हे तर सर्वांगीण विकास साधावयाचा असेल तर स्त्री विकासाला गती द्यावी लागेल. ही वर्तमानातील आवश्यकता आहे. मानवी जीवनात महिलांचे अस्तित्व अधोरेखित करण्यासाठी, महिला म्हणून गौरवाने जीवन जगण्यासाठी ,प्रत्येकच आघाडीवर महिलांना प्रोत्साहन प्राप्त करून देण्यासाठी, एकंदरीत महिला सशक्तीकरणाला अधिक गतिमान करण्यासाठी आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून  सामाजिक ,आर्थिक ,सांस्कृतिक, राजनीतिक , क्रीडा, साहित्य, इत्यादी क्षेत्रात अग्रगण्य महिलांचा सन्मान नव्हे उत्सव दिवस  साजरा करण्यात येतो. आजच्या दिनी लैंगिक समानतेबाबत जागरूकता वाढवण्याकरिता   महिलांच्या सशक्तीकरणा करीता तिला प्रोत्साहन देणे, तिच्या महिला अधिकारांची उजळणी करून देणे,महिला म्हणून जीवन जगण्याकरिता उपलब्ध आकाशाची व्याप्ती तिला परीचित करून देणे  इत्यादी प्रयोजन असू शकतात ,कारण महिला म्हणून गौणतेचा -कमीपणाचा भाव नाहीसा करणे अतिशय महत्त्वाचे आहे ,कारण महिलांचा इतिहास हा गौरवास्पद आहे ,परंतु वर्तमान हे आव्हानात्मक आहे तर भविष्यात  अधिकची दक्षता पाळावी लागणार आहे.

कारण म्हणतात ना चलतीचा जमाना असतो ,आज स्त्री वादाकारणानेच वारं बदलत आहे ,परंतु या बदललेल्या वाऱ्याचा तिने सकारात्मक उपयोग करून घ्यायला हवा.तिने स्व प्रगतीवर हुरळून जाता कामा नये ,कारण स्त्रीचे पूर्णत्व कशात आहे हा तिच्या करिता एक संशोधनाचा विषय असला पाहिजे. 

उंच आकाशात भरारी घेताना स्त्रियांना असे  म्हणावेसे वाटते की... आपण आपल्या उपभोगावर संयम ठेवा आणि गरजेनुसार बाजारातून आवश्यक गोष्टी खरेदी करा , पावती घेऊनच वस्तू खरेदी करा आणि सजग ग्राहक बनण्याचा व ग्राहक म्हणून असलेल्या आपल्या अधिकारांची माहिती करून घ्या,शक्य असेल तर ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांशी संपर्क साधा आणि ग्राहक चळवळीत सहभागी व्हा,आपली आणि समाजाची फसवणूक टाळण्यासाठी एक पाऊल पुढे टाकून तर बघा.

पुरुषांना कमी लेखू नका त्यांचा अपमान होईल असे वर्तन टाळा ,स्त्रीवादाचे स्वागत करा पण पुरुषपणाला कमी लेखू नका ,पुरुषांचा उचित सन्मान करा पुरुषत्त्वाला कमीपणा येऊ देऊ नका ,वडील भाऊ मित्र नवरा मुलगा सहकारी सर्व स्तरीय पुरुषांचा योग्य मान ठेवा तरच खऱ्या अर्थाने ,

सर्वे भवन्तु सुखीन: सर्वे संतु निरामया || या उक्तीला अंगीकारले असे होईल,

कारण लैंगिक समानता ही बाब स्त्रियांच्या देखील लक्षात असणे गरजेचे आहे. 

नर और नारी एक समान 

विकसित भारताचे लक्ष पूर्ण करण्यासाठीच तर स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाला गतिशीलता प्रदान करणे ही काळाची गरज आहे हेच ओळखून सर्व स्तरांवर योजना कार्यान्वित केल्या जात आहेत . धोरणं आखली जात आहेत. महिला सवलतींचा पाऊस पडतो आहे. परंतु तिने भविष्याची कास ठेवून अधिक सजगतेने तिच्यातील स्त्रीत्वाचे भान ठेवणे अधिक आवश्यक आहे. स्त्री पण जपा. स्त्री पण असेल तरच स्त्री असेल. स्त्रीपणातच तिचा सन्मान आहे हे कधीही विसरता कामा नये. महिलादिनी स्वतःचाच स्त्री म्हणून गौरव करा. मनुष्य जीवनाचे वास्तविक ध्येय आनंद अनुभवणे. स्वतःही आनंदी राहा आणि सर्वांना आनंदी करा. 

जय माँ भारती वंदे मातरम 🙏

८ मार्च २०२५ जागतिक महिला दिवस तसेच १५ मार्च २०२५ ग्राहक दिवस निमित्याने ......एक मनोगत!

आदी तू, अनंत तू, शक्ती स्वरूप तू, चराचरात व्याप्त नारी शक्तीला आणि त्याहून प्रबळ ग्राहक शक्तीला  शतशः नमन 🙏


वैशाली गावंडे, अकोला.


दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️



Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.