बिग ब्रेकिंग:- दीड वर्षापासून फरार असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी सावली वनपरिक्षेत्राची सिनेस्टाईल कारवाई.
बिग ब्रेकिंग:-
दीड वर्षापासून फरार असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी सावली वनपरिक्षेत्राची सिनेस्टाईल कारवाई.
मूल सावली,दीपक देशपांडे.
वनपरिक्षेत्र सावली अंतर्गत वनगुन्हा नोंद क्रमांक. ०९२२०/२३०४८५ दि. १३/०८/२०२३
अन्वये वन्यप्राणी रानटी डुक्कर व ससा शिकार प्रकरनातील मुख्य आरोपी घटना दिनांक १३ ऑगस्ट २०२३ पासून फरार असलेले
श्री. राजेंद्रसिंग जरनेलसिंग बावरी वय-३० वर्ष रा. मुडझा त. ब्रह्मपुरी जी. चंद्रपूर यांना मुडझा येथून व
श्री. शत्रूघ्न वसंत महाडोळे वय -३२वर्ष रा. बल्लारपूर पो. मुडझा त. ब्रह्मपुरी जी. चंद्रपूर यांना बामणी तालुका जिल्हा गडचिरोली येथून आज दिनांक १९ मार्च २०२५ रोजी सावली वनपरिक्षेत्राचे पथकाने सिने स्टाईल पकडण्याची कारवाई केली.
सदरची कारवाई श्री विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली यांच्या नेतृत्वात श्री नंदकिशोर पाटील, क्षेत्र सहाय्यक पाथरी, श्री सुरेंद्र सिंग वाकडोत क्षेत्र सहाय्यक राजोली, श्री रवी सूर्यवंशी क्षेत्र सहाय्यक व्याहाड आणि वनरक्षक सिरसी, श्री महादेव मुंडे, श्री खेमराज गोडशेलवार, वनरक्षक पाथरी, श्री श्रीराम आदे, वनरक्षक राजोली, श्री एकनाथ खुडे, वनरक्षक गायडोंगरी व अतिन मानकर, घनश्याम बनसोड, किशोर काटपलीवार वाहन चालक, नागेश बद्दमवार PRT बोथली यांनी यशस्वी रित्या पार पाडली. पुढील तपास श्री प्रशांत खाडे विभागीय वन अधिकारी चंद्रपूर व श्री विकास तरसे सहाय्यक वनसंरक्षक चंद्रपूर वन विभाग चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली हे करीत आहेत.

Comments
Post a Comment