स्वयंसिद्ध लेखमाला:-१० विधात्याची नव निर्माणाची कलाकृती, तू 'नव्या युगाच्या प्रगतीची चाल आहे तू.
स्वयंसिद्ध लेखमाला:-१०
विधात्याची नव निर्माणाची कलाकृती, तू 'नव्या युगाच्या प्रगतीची चाल आहे तू.
सौ. सुनिता अनिल बुटे
महिलांच्या हक्काचा दिवस म्हणजेच जागतिक महिला दिन! होय, महिला दिनाचे महत्व म्हणजे महिलांना त्यांच्या अधिकाराबद्दल जागरुक करून स्वावलंबी बनविणे होय.
हा दिवस महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे. विविध पातळीवर यशाची उंच झेप घेणाऱ्या, शेतामध्ये राबून सोनं पिकविणाऱ्या मानास पात्र ठरलेल्या - घर संसार सजविणाऱ्या या सर्व महिलांना मानाचा प्रणाम.
या दिनाच्या माध्यमातून लोकांना महिलांच्या संघर्षाची जाणीव करून दिली जाते, महिलांनी न डगमगता , संघर्षाने मात करून विजय, यश संपादन करावे, हे सांगीतले जाते.
महिलांच्या हक्क चळवळीतील एक केंद्रबिंदू म्हणजे जागतिक महिला दिन होय. हा दिवस महिलांच्या संपूर्ण क्षेत्रातील कामगिरीचा उत्सव साजरा करणारा दिवस होय. महिलांविषयी मान, सन्मान, आणि प्रेम या दिवशी साजरा करून व्यक्त केल्या जातो.
आज महिला कोणत्याही बाबतीत मागे नाहीत त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला स्वतःचे व्यक्तिमत्व घडवित आहे. आज समाजाच्या प्रगतीमध्ये महिलांचाही पुरुषांइतकाच महत्वाचा वाटा आहे. या दिवशी महिलांना जाणीव करून दिली जाते की ती कमजोर नाही बळकट, सक्षम आहे. तिच्या जीवनातील समस्या - आव्हानांसमोर ठामपणे लढा देणारी एक अद्भूत शक्ती आहे हे सांगीतले जाते.
-आपल्या हक्कासाठी, समानतेसाठी अविरत प्रयत्न करण्यासाठी तिला हिमंत देण्यासाठी हा जागतिक महिला दिन- सर्व महिलांना मी सांगू इच्छिते की,आपण जगाच्या इतिहास रचियता आहोत आपण कुठेच स्वतःला हीन समजू नये .. जेव्हा "स्त्री" शक्ती एकत्र होते ना तिथे अशक्य काहीच नसते. स्वयंसिद्ध करा स्वतःला न डगमगता. म्हणतात, की स्त्रियां संपूर्ण जगातील सर्वात सुंदर, भव्य प्राणी आहेत आणि हे खरचं सत्य आहे.
प्रत्येक महिलेची कल्पनाशक्ती इतकी वेगवान असते की ती क्षणात जीवनाचा सुखकर आनंदमय प्रवास करु शकते
ती आहे म्हणून विश्व आहे.ती आहे म्हणून घराला घरपण आहे. ती आहे. तर नात्यांत जिवंतपणा आहे ती आहे म्हणून सर्वांचा मान आहे.
अभिमान असावा प्रत्येक स्त्रीला दुसऱ्या स्त्री' चा कारण विविध नात्यांची खाण आहे प्रत्येक "स्त्री" आणि स्त्री मध्ये दडलेल्या निस्वार्थ त्याग आणि प्रेमळ मायेला प्रणाम करते,
न घाबरता महिलांनी आपले कर्तव्य पार पाडावे. वेळ आली आहे,असे म्हणण्याची,
उठ तू नारी
युग निर्माण करणे आहे
विश्वासाने प्रगतीच्या वाटेवर
तुला चालणे आहे.
नको कमजोर स्वतःला समजू
स्वतःच्या संस्कृती ने
निर्माण कर एक नवे विश्व
जगाची आशा तू,
एक सन्मान तू
कर तयार एक नवा इतिहास
स्वयंसिध्दा नारी तू-- नारी तू.
सौ. सुनिता अनिल बुटे
मुख्याध्यापिका ,बालविकास प्राथ. शाळा मूल.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment