वीज ग्राहका जागा हो.१८ अभ्यासोनी प्रगटावे ८ तक्रार कशी सोडवावी?
वीज ग्राहका जागा हो.१८
अभ्यासोनी प्रगटावे ८
तक्रार कशी सोडवावी: -
"आपली समस्या स्वत: सोडवावी व आत्मनिर्भर” व्हावे म्हणून ही मालिका सुरू केली आहे.
*उदा. : -* डॉक्टर, सीए, वकील, अशा प्रोफेशनल ग्राहकांबाबत एक गैसमज असा आहे. त्यांना व्यावसायिक दराऐवजी घरगुती दराने बिल द्यावे लागते. या संदर्भात एक स्पष्टीकरण मुद्दाम नमूद करू इच्छितो की, डॉक्टर, वकील, आर्किटेक्ट, सीए असे प्रोफेशन लोक स्वतःच्या राहत्या घराचा थोडा भाग आपल्या व्यवसायासाठी वापरतात आणि त्याच वास्तूमध्ये राहतात त्यांना घरगुती दराने विद्युत पुरवठा केला पाहिजे. परंतु एखादा ब्लॉक, बंगला, फ्लॅट, जागा जर पूर्णपणे ते त्यांच्या प्रोफेशनसाठी वापरत असतील तर त्यांना व्यावसायिक दराने विद्युत पुरवठा करणे अपेक्षित आहे. यासाठी मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे दिवाणी अपील MSEDCLVs. Shriniwas S. Odhekar क्र.११३४३ / २०२३ दि.१२.०९.२०२३ या मध्ये मा. उच्च न्यायालयाने वकील, सीए, डॉक्टर ई. व्यवसाय करणारे “Professional’s” करणा-यांचे विद्युत दर घरगुती दराप्रमाणे आकारणी करावी हा नाशिक CGRF ने दिलेला निर्णय कायम ठेवला आहे.
अनेकदा विद्युत मीटर फास्ट आहे अशा प्रकारच्या ग्राहकांच्या तक्रारी असतात. या संदर्भातसुद्धा नियम झालेले आहेत. मीटर जलद आहे अशी शंका असेल तर त्वरित संबंधित विद्युत कार्यालयाकडे यासंबंधी तक्रार दाखल करू शकता. तक्रारीसोबत सिंगल फेज मीटर, थ्री-फेज मीटर यानुसार मा. आयोगाने मंजुरी दिलेल्या प्रचलित नियमानुसार टेस्टिंग फी भरणे अपेक्षित आहे. अशी फी भरल्यापासून ४ दिवसांमध्ये संबंधित विद्युत कंपनीने मीटर टेस्ट केले पाहिजे. त्याचे टेस्ट सर्टिफिकेट ग्राहकाला दिले पाहिजे. जर मीटर सदोष आढळले तर आधीच्या ३ महिन्यांपर्यंतचे बिल दुरुस्त करून देणे विद्युत वितरणवर बंधनकारक आहे. मात्र जर मीटरमध्ये दोष आढळले नाही तर ग्राहकाला कुठलीही सूट मिळत नाही. मीटर सदोष आढळले तर ते विद्युत वितरणच्या खर्चानेच बदलून दिले जातो आणि त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे जे टेस्टिंग चार्जेस भरले ते ग्राहकाला परत केले जातात.
आपला स्नेहांकित ग्राहक हितार्थ सेवक,
अजय भोसरेकर,
*क्रमशः १८*
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment