कृषी महाविद्यालय मूल अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची सव्वीसावी बैठक संपन्न

 कृषी महाविद्यालय मूल अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची सव्वीसावी बैठक संपन्न

मूल ११: दीपक देशपांडे 

कृषी महाविद्यालय, मूल आयोजित *सव्वीसावी* शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची बैठक दिनांक ११ फेब्रुवारी, २०२५ रोजी ग्राम टेकाडी ता. मूल जि. चंद्रपूर येथे संपन्न झाली. याप्रसंगी कृषी महाविद्यालय, मूलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विष्णुकांत टेकाळे, गावाचे उपसरपंच श्री शंकर सिडाम, प्रगतशील शेतकरी श्री मनोज चौधरी, श्री सुनील गेडाम, इतर शेतकरी बांधव तसेच कृषी महाविद्यालय, मूल येथील विषयतज्ञ मंडळी उपस्थित होती. सर्वप्रथम कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता यांनी *कृषी महाविद्यालय, मूल निर्मित गांडूळखत टेकाडी* येथील उपसरपंच यांना *भेट* स्वरुपात दिली.  या बैठकीत मुख्यत्वे ने “ रब्बी व उन्हाळी पिकांचे व्यवस्थापन ” या विषयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विष्णुकांत टेकाळे यांनी शेतकऱ्यांनी केवळ धानपिकावर अवलंबून न राहता, तेलबिया, कडधान्य, तृणधान्य, फुलशेती व विविध भाजीपाला पिकांची लागवड करावी, शेतीसोबतच शेती पूरक व्यवसाय करणे सुद्धा महत्वाचे असल्याचे सांगितले, तसेच कृषी विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या कृषिसंवादिनीबाबत सविस्तर माहिती दिली व विद्यापीठाचे तंत्रज्ञान असलेली कृषिसंवादिनी प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात, शेतकऱ्यांना माहितीकरिता ठेवावी अशी विनंती केली व कृषी विद्यापीठ तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असे सांगितले. प्रा. मोहिनी पुनसे , विषयतज्ञ कृषिविद्या, यांनी सेंद्रिय पदार्थाच्या कमतरतेमुळे दिवसेंदिवस खालावत चाललेला जमिनीचा पोत याबाबत माहिती दिली. सेंद्रिय कार्बनचे महत्त्व पटवून दिले. तीळ व भूईमुंग या तेलबिया लागवड तंत्रज्ञान तसेच गांडूळखत, जीवामृत व दशपर्णी अर्क बनविण्याच्या प्रक्रिये बाबत सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली. उद्यानविद्या विषयतज्ञ, डॉ. अश्विनी गायधनी , यांनी भाजीपाला पिकामध्ये आच्छादनाचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून सांगितले. भाजीपाला पिकामध्ये योग्य वेळी लागवड करणे आवश्यक असल्याचे सांगितले. व सापाळा पिके म्हणून झेंडू पिक लावण्याचे सुचविले. प्रा. देवानंद कुसुंबे , कृषि विद्या विषयतज्ञ यांनी उन्हाळी धान व हरभरा पिकाचे तण, खत व पाणी व्यवस्थापन याबाबत माहिती सांगितली, व निंबोळी अर्क कसे तयार करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. गितांशु डिंकवार , वनस्पतीरोगशास्त्र विषयतज्ञ, यांनी रासायनिक खत, बुरशीनाशक, कीटकनाशक वापरण्याऐवजी जैविक खते व कीटकनाशके उदा. ट्रायकोडर्मा, बिवेरीया, मेटारीझीयम इत्यादींचा वापर करण्यास सांगितले. धान्य, कडधान्य व भाजीपाला पिक पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाचा वापर करण्यास संगितले. तसेच धान व भाजीपाला पिकांवरील रोग व किडींचे एकात्मीक व्यवस्थापनाबाबत माहिती त्यांनी दिली. *विद्यापीठाने प्रकाशित* केलेली  कृषिसंवादिनी - २०२५ व कृषी महाविद्यालय, मूल निर्मित *गांडूळखत व वर्मीवॉशची* खरेदी शेतकऱ्यांनी याप्रसंगी केली. 

सदर कार्यक्रमास एकुण ३६ शेतकरी व ६ शास्त्रज्ञ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संचालन केले व उपस्थितांचे आभार प्रा. मनीषा लवकर यांनी मानले.


दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.            ✍️Ddbatmi@m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.