स्नेहा कोसरे मारिया महाविद्यालय मूल हिची राष्ट्रीय सेवा योजना विभागा अंतर्गत राज्यस्तरावर निवड

 स्नेहा कोसरे मारिया महाविद्यालय मूल हिची राष्ट्रीय सेवा योजना विभागा अंतर्गत राज्यस्तरावर निवड

मूल तालुक्यातील गुणवंत.


मूल, दीपक देशपांडे 

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली राष्ट्रीय सेवा योजना विभागच्या वत्तीने दि.१३/२/२०२५ ला उत्कर्ष निवड चाचणी नुकतीच पार पडली. त्यामध्ये मारिया महाविद्यालयाचा १ स्वयंसेवक तर ६ स्वयंसेविका असे ऐकून  ७ विद्यार्थी  राज्यस्तरीय निवड चाचणी मध्ये सहभागी झालेले होते. त्यामध्ये स्नेहा कोसरे बी.एस्सी. प्रथम वर्ष या विद्यार्थिनीने संकल्पना नृत्य, समुह गित, कविता,भजन, वकृत्व स्पर्धा अशाप्रकारे विविध पाच स्पर्धेत सहभाग घेतला होता. तिची निवड राज्यस्तरावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली संघात झाली. दि.२३/२/२०२५ ते २५/२/२०२५ या कालावधीमध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ,पुणे येथे ती सहभागी होणार आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभागातील राज्यस्तरावर जाणारी मारिया महाविद्यालयाची  पहिली विद्यार्थीनी असल्याने तिच्या या यशाबद्दल बल्लारपूर सेवा समितीचे अध्यक्ष मान. जैनुद्दीन जव्हेरी  साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य मान.डॉ. भास्कर सुकारे, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रफुल निरूडवार, सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन करून कौतुक केले आहे.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.