वीज ग्राहका जागा हो.१६. अभ्यासोनी प्रगटावे:- ६ तक्रार कशी सोडवावी.

 वीज ग्राहका जागा हो.१६.

अभ्यासोनी प्रगटावे:- ६

तक्रार कशी सोडवावी: -

“आपली समस्या स्वत: सोडवावी व आत्मनिर्भर” व्हावे म्हणून या मालिका सुरू केल्या आहेत.

उदा. : -  एका ग्राहकाने विद्युत बिल भरायचे राहून गेले. अंतिम मुदत संपल्यानंतर ८ दिवसात विद्युत वितरणचे अधिकारी त्यांच्याकडे हजर झाले आणि असे सांगितले की, विद्युत बिल भरलेले नाही म्हणून विद्युत पुरवठा खंडित करत आहोत. २ दिवसांची मुदत देण्याची ग्राहकाने परोपरीने विनंती केली. परंतु त्याला दाद न देता विद्युत पुरवठा खंडीत केला. शनिवार, रविवार सुट्टीचे दिवस होते. विद्युत वितरणाचे ऑफिस उघडे नसते. त्यामुळे ग्राहकाने सोमवारी बिल भरले. त्यांचा विद्युत पुरवठा परत जोडणी खर्च भरूनच सुरू झाला. ग्राहकाने या प्रकाराबद्दल तक्रार करून दाद मागितली. कुठल्याही प्रकारची नोटिस न देता त्यांचा विद्युत पुरवठा खंडीत केला होता. याची दखल घेऊन त्यांना ४८ तासांचे प्रती तासाला रु.५०/- प्रमाणे रु.२,४००/- नुकसानभरपाई देण्याचा आदेश विद्युत वितरणाला देण्यात आला.खंडीत विद्युत पुरवठा दुरुस्तीला विलंब झाल्यास विद्युत वितरणकडून काही कारणाने विद्युत पुरवठा खंडित झाला तर यासाठी विद्युत नियामक आयोगाने विद्युत पुरवठा संहिता व कृतीची मानके (स्टँडर्ड ऑफ परफॉर्मन्स SOP) नुसार नियम घालून दिलेले आहेत. प्रथम जानेवारी २००५ मध्ये, त्यानंतर ऑगस्ट २०१४ मध्ये, आणि आता सुधारित २०२१ मध्ये या नियमांमध्ये आणखी वाढ करण्यात आली. शहरी व ग्रामीण भाग या प्रत्येक भागात विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर त्याच्या दुरुस्तीच्या काळासंबंधी नियमावली नमूद करण्यात आला आहे. 

१) खांबावरील फेज गेला किंवा फ्यूज गेला म्हणून विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास शहरांमध्ये ३ तासांत, आणि ग्रामीण भागात १८ तासांत ही दुरुस्ती होऊन विद्युत पुरवठा सुरळीत होणे अपेक्षित आहे. 

२) ओव्हरहेड वायर्स किंवा विद्युत वाहक तारांमध्ये काही बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झालास शहरांमध्ये ४ तासांत व ग्रामीण भागात २४ तासांत पुरवठा पूर्ववत होणे अपेक्षित आहे. 

३) जमिनीखालून जाणा-या तारांमध्ये बिघाड झाल्यास शहरामध्ये ८ तासांत व ग्रामीण भागात ४८ तासांत दुरुस्ती पूर्ण होऊन विद्युत पुरवठा पूर्ववत होणे अपेक्षित आहे. 

४) ग्रामीण भागात रोहित्र (डिपी) बिघडला किंवा जळाला व मीटर जळाला तर शहरांमध्ये १८ तासांत व ग्रामीण भागात ४८ तासांत दुरुस्ती पूर्ण होऊन विद्युत पुरवठा पूर्ववत होणे अपेक्षित आहे.

वरील ४ ही परिस्थितीत ठरून दिलेल्या तासात पुरवठ्यातील दोष दूर न केल्यास सर्व बाधित ग्राहकांना प्रत्येक तासाला रु. ५०/- ते रु. १०००/-  पर्यंत इतकी नुकसानभरपाई ग्राहकाने लेखी मागणी केल्यावर विद्युत वितरणाने देणे अपेक्षित आहे. 

परंतु दुर्दैवाने ही नियमावली लोकांपर्यंत पोहोचू दिली गेली नाही. विद्युत ग्राहकांनी व ग्राहक संघटनांनी ही हे जाणून घेण्याचा प्रयास केला नाही. त्याची यथायोग्य प्रसिद्धी केली नाही ही वस्तुस्थिती आहे. याचे कारण विद्युत कायद्याची व यासंबंधी नियमांची आपल्याला माहिती नसते.

२००५ मध्ये आता २०२१ मध्ये नियमावली झाल्यानंतर २००७ मध्ये काही ग्राहक संघटनांनी प्रयत्न करून विद्युत वितरणच्या सर्व कार्यालयांमध्ये ही नियमावली प्रदर्शित करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला. त्यानंतर विद्युत वितरणाने सर्व कार्यालयांमध्ये नियमावली प्रदर्शित केली.


आपला स्नेहांकित ग्राहक हितार्थ सेवक,

अजय भोसरेकर,

*क्रमशः १६*


दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️



Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.