वीज ग्राहका जागा हो,१५.अभ्यासोनी प्रगटावे ५ तक्रार कशी सोडवावी: -

 वीज ग्राहका जागा हो.१५.

अभ्यासोनी प्रगटावे:- ५

तक्रार कशी सोडवावी: -

“आपली समस्या स्वत: सोडवावी व आत्मनिर्भर” व्हावे म्हणून या मालिका सुरू केल्या आहेत


उदा. : -  एका खेडे गावामध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला ट्रान्स्फॉर्मर नादुरुस्त झाला. विद्युत वितरणाकडे शेतक-यांनी तक्रार दाखल केली. संबंधित अधिका-यांनी त्यांना सांगितले की, आता पावसाळा सुरू झाला आहे. तुम्हाला आता काहीही विद्युत लागत नाही. त्यामुळे तुमची दुरुस्ती करणार नाही. पावसाळा संपल्यानंतर बघू. जवळपास ४ महिने शेतक-यांचा ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त राहिला. शेवटी ४ महिन्यांनंतर हा ट्रान्सफॉर्मर दुरुस्त झाला. तेव्हा त्या मंडळीनी प्रथम माहिती अधिकारात अर्ज केला. विद्युत वितरणाकडून ट्रान्सफॉर्मर नक्की किती दिवस बंद होता हे लिहून घेतले. त्यानंतर ट्रान्स्फॉर्मर ४ महिने बंद होता हे लेखी माहिती मिळाली. मग विद्युत पुरवठा संहिता, कृतीची मानके २०२१ ची नियमावली सांगितली. त्या मंडळींनी लढा द्यायला सुरुवात केली. अंतर्गत तक्रार निवारण कक्ष, ग्राहक गा-हाणे निवारण मंच व विद्युत लोकपालापर्यंत लढा दिला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. नियमाप्रमाणे ४८ तासांत दुरुस्ती होणे अपेक्षित असतानाही जवळपास ४ महिने दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे विद्युत वितरणाने ४८ तासांनंतरच्या प्रत्येक तासाला रु. ५०/-प्रमाणे  नुकसानभरपाई शेतक-यांना दिली पाहिजे. असा आदेश विद्युत लोकपालांनी दिला आणि या ५ शेतक-यांना प्रत्येकी जवळपास रक्कम रु. १ लाख १६ हजार एवढी रक्कम मंजूर झाली. याचा अर्थ असा आहे की, विद्युत पुरवठा संहिता, कृतीची मानके (SOP) या नियमावलीची माहिती आपण समजावून घेतली, तर त्याचा फायदा करून घेता येऊ शकतो आणि व्यवस्था ही सुधारू शकते. मात्र ग्राहकाने लेखी तक्रार (Pen War) तत्परतेने / तातडीने नोंदवणे आवश्यक असते.


आपला स्नेहांकित ग्राहक हितार्थ सेवक,

अजय भोसरेकर,

*क्रमशः १५*


दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️



Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.