*वीज ग्राहका जागा हो.* १४. *अभ्यासोनी प्रगटावे*४

*वीज ग्राहका जागा हो.* १४.

*अभ्यासोनी प्रगटावे* ४

*तक्रार कशी सोडवावी: -*













*उदा. : -* एका सोसायटीमध्ये पोलपासून मीटरपर्यंतची विद्युत केबल जळाली. केबल जळाल्यानंतर त्यांनी जेव्हा विद्युत वितरणकडे विद्युत खंडीत झाल्याची तक्रार दाखल केली तेव्हा विद्युत वितरणच्या अधिका-यांनी पाहणी करून सांगितले की, तुमच्या सोसायटीत पोलावरून येणारी केबल जळाली आहे. तुम्ही ती आणून द्या. मग तुमचा विद्युत पुरवठा सुरू होईल. विद्युत खंडित झाल्यामुळे लोक हवालदिल झाले होते. त्यांनी तातडीने प्रत्येक रु.१ हजार गोळा करून रु.२५ हजाराची केबल विकत आणण्याची तयारी सुरू केली. परंतु त्यांच्यापैकी एकाला थोडा संशय आला म्हणून त्यांनी तज्ञांशी संपर्क साधला असता त्यांना सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत तुम्ही केबल आणून देणे अपेक्षित नाही. त्यावर ते म्हणाले केबल आणून काम केले नाही तर आम्ही अंधारात राहू. मी त्यांना म्हटले तुम्ही तक्रार दाखल केली आहे का ? ते हो म्हणाले, त्यांना एवढेच सांगा की, विद्युत पुरवठा संहिता, कृतीची मानके २०२१ प्रमाणे तक्रार दाखल होऊन ६ तास होत आलेले आहेत आणि केबलमधला बिघाड दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला फक्त ६ तास आहेत. त्यानंतर सोसायटीत राहणा-या सर्व २५ ग्राहकांना दर तासाला रु.५०/- एवढी नुकसानभरपाई तुम्हाला द्यावी लागणार आहे. तेव्हा केबल कधी बसवायची विद्युत पुरवठा कधी सुरू करायचा याचा निर्णय तुम्ही घ्या. हे विद्युत वितरणच्या अधिका-यांना सांगितल्यानंतर अक्षरशः तासाभरात केबलचा गुंडाळा घेऊन विद्युत वितरणचे कर्मचारी सोसायटीत दाखल झाले आणि तातडीने केबल टाकून विद्युत पुरवठा सुरळीत सुरु केला. 

*याचा मतितार्थ एवढेच आहे की थोडेसे नियम माहीत करून घेतले तर आज ज्या गोष्टींची भीती वाटते. ज्यामुळे विद्युत वितरणसारख्या एकाधिकारशाही सेवा पुरवठादाराना घाबरतो ती भीती निश्चितपणे नष्ट होऊ शकते.*

आपला स्नेहांकित ग्राहक हितार्थ सेवक,

अजय भोसरेकर,

*क्रमशः १४*


दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️



Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.