*वीज ग्राहका जागा हो.* १३. *अभ्यासोनी प्रगटावे*३

*वीज ग्राहका जागा हो.* १३.

*अभ्यासोनी प्रगटावे*३



“आपली समस्या स्वत: सोडवावी व आत्मनिर्भर” व्हावे म्हणून या मालिका सुरू केल्या आहेत


*कोणती तक्रार कोठे करावी : -*

काही समस्या / प्रश्न असतील तर त्या सर्व समस्या / प्रश्न विद्युत वितरण कंपनी, शाखा शाखा / सहाय्यक अभियंत्याकडे तक्रारींचे

 *स्वरूप :-* रिंडींग प्रमाणे विद्युत बिल न देणे,चुकीचे व सरासरी पद्धतीने विद्युत बिल देणे,नियमीत व पुरेशा दाबाने विद्युत पुरवठा होत नाही. विद्युत पुरवठा खंडीत झाला. ट्रान्सफार्मरमधील फ्युज गेला, सर्व्हिस वायर सदोष असल्याने खांबावरील तारा लूझ असल्याने स्पार्किंग होणे, शेतातील तारा सैल / लूज असल्यामुळे शेती पिकाचे उदा.ऊस, सोयाबीन इ. ठिणगी पडून जाळण्याची शक्यता असल्याच्याबाबत इ. सर्व तक्रारी प्रथम शाखा / सहाय्यक अभियंत्याकडे लेखी स्वरुपात करून त्याची पोहोच घ्यावी.

*उपकार्यकारी अभियंता :-* 

लाईमन वायरमन नियुक्तीच्या ठिकाणी निवासी नाही. विद्युत बिल दुरूस्ती / भरणा करण्यास टाळाटाळ, रिडींग प्रमाणे विद्युत बिल मिळत नाही, कोटेशन भरून अनेक महिने / वर्षे झाली अद्याप कनेक्शन नाही, ट्रान्सफार्मला किट कॅट फ्युज नाही. अर्ज देऊन अनेक दिवस / महिने झाले लोड सर्व्हेरिर्पोट करत नाही, अग्रक्रम याद्या तयार नाही. त्यानुसार कनेक्शन नाही. इ. स्वरुपाच्या तक्रारी सहाय्यक अभियंता स्तरात करून लेखी स्वरुपात करून त्याची पोहोच घ्यावी.

*कार्यकारी अभियंता :-*

ऊर्जा मित्र बैठका होत नाही, ज्याक्रमाने विद्युत मागणी अर्ज येतात त्या क्रमाने / अग्रक्रम यादी नुसार मंजुरी / कनेक्शन देत  / मिळत नाही, ट्रान्सफार्मर जळाल्यास विहीत मुदतीत देत नाही, डिपी जळाल्यास फेल्युअर रिर्पोट त्वरीत बनवत नाही. अधिकारी कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी निवासी नाही, कार्यालयात विद्युत ग्राहकांच्या कामासाठी अधिकारी कर्मचारी कधी भेटणार त्याचा वार, वेळापत्रक, फलक नाही त्या प्रमाणे ते भेटत नाही “अ १फार्म” सहीत तक्रार अर्जाचे नमुने कार्यालयात उपलब्ध नाहीत. ऊर्जा मित्र बैठकीतील विषय पूर्ण करत नाहीत  इ. लेखी स्वरुपात करून त्याची पोहोच घ्यावी.

*अधिक्षक अभियंता :-*

 वरील सर्व तक्रारी स्थानिक शाखा / सहाय्यक अभियंता, उपविभागीय अभियंता, कार्यकारी अभियंता, कार्यालयाकडील सर्व तक्रारी अधिक्षक वरीलपैकी दोन्ही ठिकाणी नसल्यास अभियंतायांच्याकडे करून लेखी स्वरुपात करून त्याची पोहोच घ्यावी.

*मुख्य अभियंता :-*

वरील सर्व कार्यालय अधिकारी, कर्मचारी यांच्या तक्रारी लिखीत स्वरूपात करता येतील. नियमबाह्य पैशाची मागणी करणे. कामाच्या वेळेत मद्यपान करून इतरत्र फिरणे कोणतीच कामे विहीत मुदतीत न करणे इ. स्वरुपाच्या तक्रारी लेखी स्वरुपात करून त्याची पोहोच घ्यावी.

*अंतर्गत तक्रार निवारण समितीकडे :-*

 वरील सर्व अधिकारी कर्मचा-यांबद्दल व कार्यालयीन कर्मचा-यांबद्दलच्या सर्व तक्रारी तक्रार करता येतील.

ग्राहकाने आपले विद्युत बिल तपासून, बीलातील विविध आकार व आवश्यक माहिती जाणून घ्यावी.

ग्राहकाच्या वीजेचा दर विद्युत वापरानुसार वाढत जातो सुरुवातीच्या युनिटसाठी तो कमी व नंतरच्या युनिटसाठी तो वाढत जातो.

*विद्युत बिल भरण्याची अंतीम तारीख देयक दिनांकापासून कमीत कमी २१ दिवसांची असणे बंधनकारक आहे.*

*२ वर्षानंतर बिलावर सतत नमूद केल्याशिवाय थकबाकीची कोणतीही रक्कम विद्युत कंपनी ग्राहकाकडून वसूल करु शकत नाही.*

विद्युत पुरवठा बंद करण्याआगोदर विद्युत कंपनीला ग्राहकास *कलम ५६ ची स्वतंत्र नोटीस* पाठवावी लागते. 

*विद्युत कंपनी ग्राहकाला जास्तीत जास्त सलग ३ वेळा सरासरी विद्युत बिल पाठवू शकते.*

अवास्तव अथवा चुकीचे बिल आल्यास ग्राहकाला सर्व रक्कम भरणे आवश्यक नाही तो आपल्या मागील सहा महिन्याच्या विद्युत बिलाची सरासरी रक्कम निषेध नोंदवून भरु शकतो.


आपला स्नेहांकित ग्राहक हितार्थ सेवक,

अजय भोसरेकर,

*क्रमशः १३*


दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.