माणूस टिकावा असे वाटत असेल तर....... पर्यावरण टिकवून ठेवणे गरजेचे:-डॉ .प्रा.सुरेश चोपणे.

 माणूस टिकावा असे वाटत असेल तर....... पर्यावरण टिकवून ठेवणे गरजेचे:-डॉ .प्रा.सुरेश चोपणे.

मूल येथे तृतीय राष्ट्रीय पर्यावरण संमेलन २०२५ पहिल्या सत्रातील मोठा धमाका.

मूल, दीपक देशपांडे.













मूल येथील कन्नमवार सांस्कृतिक सभागृहात  नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेद्वारे आयोजित करण्यात आलेल्या तृतीय राष्ट्रीय पर्यावरण संमेलन २०२५ च्या पहिल्या सत्रात  चंद्रपूर येथील खगोल शास्त्रज्ञ मा.डाॅ.प्रा.सुरेश चोपणे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमंत्रित होते आणि त्यांचा विषय होता पर्यावरणाचा होणारा ऱ्हास व त्यावरील उपाययोजना .या विषयावर आपले अमुल्य विचार व्यक्त करताना  त्यांनी अतिशय स्पष्टपणे सध्या पर्यावरण बचाव चा नारा दिला जात असला तरी हा संघर्ष  केवळ पर्यावरणाच्या रक्षणाचा नाहीच तर हा संघर्ष मानवाच्या बचावाचा संघर्ष असून आपल्या भावी पिढीला जीवंत ठेवायचे असेल तर माणूस नावाच्या प्राण्यांच्या रक्षणासाठी पुढे येण्याची गरज व आवश्यकता आहे.

याबाबत पुढे स्पष्टीकरण देताना ते म्हणतात ,आज माणूस शहरीकरण व औद्योगिकीकरणाच्या नावाखाली प्रचंड प्रमाणात वृक्षतोड करीत आहे परिणामी जैवविविधता नष्ट होत चालली असून यामुळे वेगवेगळ्या प्राणीमात्रांना होणारे आजार व त्याविरुद्ध लढण्याची त्यांची कार्यशिलता आपोआप नष्ट होत चालली असून आता ते रोग जर इतर प्राण्यांवर आक्रमण करुन लागले तर याविरुद्ध लढण्याची व या आजारांशी सामना करण्याची इतर प्राण्यांची क्षमता ढासळत चालली आहे आणि जर ही जैवविविधता नष्ट झाली तर शेवटी सगळ्या रोगाचा मारा हा माणूस नावाच्या प्राण्यांवर होईल आणि तेंव्हा आपण त्याविरुद्ध लढा देण्यासाठी सक्षम नसल्याने महामारीचे संकट आपल्यावर कोसळेल ,हा त्यादृष्टीने अतिशय गंभीर परंतू चिंतनाचा विषय आहे.

पाच वर्षांपूर्वी कोरोनाच्या रुपाने ती सुरुवात झाली असून त्या काळात किती भयंकर घटना घडल्या होत्या त्या घटना ताज्या असतानाच आता नवीन व्हायरसचा प्रकोप जाणवायला सुरुवात झाली आहे आणि यानंतर दर पाच ते दहा वर्षांत असे प्रकार वारंवार होत राहणार असल्याचे स्पष्ट करीत वेळीच जनजागृती करीत पर्यावरण रक्षणासाठी व आपले भविष्य रक्षणासाठी एकत्रित लढा देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.

आजकाल सगळे ऋतू चक्र बदलले असून वर्षभरात तीन -तीनदा उन्हाळ्यात हिट वेव आणि  ४८°c वा त्याहून  अधिक तापमानाची नोंद , पावसाळ्यात दोनतीनदा ढगफुटी आणि  कित्येकदा केवळ एका  दिवसात/तासाभरात   १००मिली.हून अधीकचा पाऊस केवळ २४तासात प्रकार तर हिवाळ्यात तीन-तीनदा थंडीचा कहर जाणवून तापमान  ८-९°c हून कमी होऊन जाते हादेखील बदललेल्या वातावरणाचा परिणाम असून  यानंतर हे असे प्रकार वारंवार वाढतच राहणार आहेत,यासाठी बदललेला पर्यावरणीय असमतोलच कारणीभूत आहे ,हे लक्षात घेणे गरजेचे आहे ,

एवढी विषयाची गंभीरता स्पष्ट केल्यानंतर यावर उपाययोजना स्पष्ट करताना आज आपल्या देशात वनजमीन दिवसेंदिवस कमी होत चालल्याची खंत व्यक्त करीत त्यावर फारशी चर्चा न करता आता प्रत्येक नागरिकाला आपल्या घरी किंवा  आपल्या परिसरात किमान दोन वृक्ष लाऊन त्यांचे संवर्धन करीत जैवविविधता कशी टिकवता येईल याचा अभ्यास आणि विचार करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे स्पष्ट केले. शेतीत कमी किटकनाशके व खते वापरून उत्पादन कसे वाढवता येईल यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता व आपल्या सोबतच इतर प्राणी, पक्षी, वनस्पती, किटक,  यांचाही समतोल कसा सांभाळता येईल यादृष्टीने प्रयत्न करण्याची आवश्यकता प्रतिपादीत केली ,व अशा संमेलनात याविषयावर चर्चा व मंथन होणे गरजेचे असल्याचे व मंथनातून पुढे येणाऱ्या विषयांना सामायिक करीत त्यातून समाजप्रबोधन होण्याची आवश्यकता व्यक्त केली.



याप्रसंगी मंचावर,मान.सुयोग धस संस्थापक, राष्ट्रीय नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था ,मान.जयरामजी नागर, जेष्ठ सिने अभिनेते,तथा ब्रॅण्ड ॲम्बेसेडर नै.प.सं.व मा.वि.सं.,मान.विकास महंते,ब्रॅण्ड ॲम्बेसेडर , कोकण विभाग,दीपक भवर, राष्ट्रीय उपाध्यक्ष, सचिन वाघ, राष्ट्रीय सचिव, डॉ खापकर नागपूर,आसियान रिझवी, राष्ट्रीय सचिव, सोमनाथ कुताळ, रविंद्र पोटे,बादल बेले महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, डॉ प्रिती तोटावार महाराष्ट्र राज्य अध्यक्षा आदी मान्यवर उपस्थित होते.

दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली,त्यानंतर अशोक येरमे आणि चमूसह सौ.रणदिवे यांनी वृक्ष गीत गायनाने  कार्यक्रमात रंगत आणली मग पुष्पवृक्ष देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले, याप्रसंगी मान्यवरांचा शाल ,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कारही करण्यात आला.

या राष्ट्रीय संमेलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील  वेगवेगळ्या जिल्ह्यातील व विविध राज्यांतील अडिचशे-,तीनशे प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होते.यावेळी पर्यावरण विषयक कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्ती व संस्था यांच्या सत्काराचा ही समावेश करण्यात आला होता.

या कार्यक्रमात मूल शहरातील अनेक मान्यवर , पर्यावरण प्रेमी नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

या राष्ट्रीय संमेलनाची सुरुवात सकाळी नवभारत विद्यालयाच्या प्रांगणातून वृक्ष दिंडी काढून करण्यात आली ती वृक्ष दिंडी नगर परिक्रमा करुन कन्नमवार सांस्कृतिक सभागृहात दाखल झाली.

दूपारच्या सत्रात , पर्यावरण संवर्धन व मानवाची जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन व अन्य विषयांवर चर्चा करण्यात येऊन काही ठराव पारित करुन ते शासनाकडे पूर्ततेसाठी मागणी स्वरुपात पाठविण्यात येणार आहेत.

कार्यक्रमाचे संचालन मिरा शेंडे,मूल तालुका अध्यक्षा यांनी केले.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.            ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.