वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत या पंधरवड्यातील ग्रंथालय प्रदर्शनीचे' उद्घाटन संपन्न.

 कर्मवीर महाविद्यालय मूल येथे  वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत या पंधरवड्यातील ग्रंथालय प्रदर्शनीचे'  उद्घाटन संपन्न



मूल -दीपक देशपांडे    

शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित व गोंडवाना विद्यापीठ संलग्नित कर्मवीर महाविद्यालय मूल येथे १ जानेवारी ते १५ जानेवारी  या  कालावधीत वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य डॉ.अनिता वाळके यांच्या अध्यक्षतेखाली १ जानेवारी २०२५ ला महाविद्यालयाच्या ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनीचे उद्घाटन डॉ.रंगनाथ स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पंधरवड्याचे रीतसर उद्घाटन करण्यात आले.

 कार्यक्रमाकरिता विशेष अतिथी ज्येष्ठ पत्रकार प्रा.चंद्रकांत मणियार लोकमत समाचार,,दीपक देशपांडे डीडिन्युज पोर्टल मुख्य संपादक, गुरुभाऊ गुरनुले देशोन्नती, अमित राऊत,विनोद काळबांधे आदी पत्रकार उपस्थीत होते.ग्रंथ प्रदर्शनामध्ये कादंबरी,आत्मचरित्र,स्पर्धा परीक्षा,विविध विषयांचे ग्रंथ ठेवले होते. पाहुण्यांनी ग्रंथाचे अवलोकन केले , तसेच पंधरवाड्याकरिता शुभेच्छा दिल्या.  प्राचार्य डॉ.अनिता वाळके यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी,विविध ग्रंथाचे वाचन करून आदर्श विद्यार्थी निर्माण व्हावे या उद्देशाने वाचन संस्कृती पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले असे मत  व्यक्त केले.

उद्घाटन कार्यक्रमाला सर्व वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापकवृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.ही प्रदर्शनी १५ जाने २०२५पर्यंत  विद्यार्थीसाठी सुरू राहणार आहे.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.          ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.