ग्राहक दर्पण :- वीज ग्राहका जागा हो. ४.
ग्राहक दर्पण :-
वीज ग्राहका जागा हो. ४.
*ग्राहकांनी “बिलाचे वाचना बाबत” नोंद घ्यावी असे काही :-*
१) ग्राहकाने विद्युत बिल तपासून घ्यावे आणि बिलात नमूद केलेल्या विविध आकारांबद्दल आवश्यक माहिती समजून घ्यावी.
२) वीजेचा दर विजेच्या वाढत्या वापराबरोबर वाढतो. हा दर सुरुवातीच्या युनिटसाठी कमी असतो आणि वापराची युनिट वाढली की वाढतो.
३) घरगुती ग्राहकांसाठी बिल भरण्याचा देय दिनांक बिलाच्या दिनांकापासून किमान २१ दिवसांनंतरचा असणे बंधनकारक आहे.
४) ग्राहकाला सुरक्षा अनामत रक्कम म्हणून २ देयक चक्राच्या सरासरी बिलाची रक्कम भरावी लागते.
५) सुरक्षा अनामत रक्कम गेल्या १२ महिन्यातील बिलांच्याआधारे ठरते आणि या रक्कमेची फेरगणना दरवर्षी केली जाते.
६) ग्राहकाकडून कंपनीला देय असलेली किंवा थकबाकी असलेली कोणतीही रक्कम सुरक्षा अनामत रक्कमेतून वसूल करता येते.
७) सर्व बिलांवर वारंवार नमूद केल्याशिवाय थकबाकीची कोणतीही रक्कम २ वर्षांनंतर विद्युत कंपनी ग्राहकाकडून वसूल करू शकत नाही.
८) *विद्युत पुरवठा खंडित करण्यापूर्वी कंपनीने ग्राहकाला स्वतंत्र १५ दिवसाची नोटीस पाठवणे आवश्यक व बंधनकारक आहे.*
९) *कंपनी ग्राहकाला सरासरी बिल जास्तीत जास्त ३ वेळा पाठवू शकते.*
१०) सरासरी बिल ३ महिन्यापेक्षा जास्ती दिले जात असल्यास, ग्राहकाने कंपनीकडे लेखी तक्रार / app / वेबसाईटच्या माध्यमातून / टोल फ्री नंबरवरून तक्रार करणे अत्यावश्यक आहे. *“तर ३ महिन्यानंतरचे सरासरी बिल कंपनीस वसूल करता येणार नाही.”*
११) चुकीच्या बिलाची देय रक्कम ग्राहकाने पूर्णपणे भरणे आवश्यक नाही, ती निषेध नोंदवून गेल्या ६ महिन्यांच्या बिलाची सरासरी एवढी रक्कम भरू शकतो.
*आपला स्नेहांकित ग्राहक हितार्थ सेवक,*
अजय भोसरेकर,
मा. अध्यक्ष, (विद्युत)
ग्राहक तक्रार निवारण मंच,
क्रमशः ४.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment