ग्राहक दर्पण:-वीज ग्राहका जागा हो. २

 ग्राहक दर्पण 

वीज ग्राहका जागा हो. २



ग्राहकांनी “नवीन विद्युत पुरवठा व नावात बदल करणे” बाबत नोंद घ्यावी असे काही :- मागील भागावरुन पुढे....

७) नवीन जोडणी घेताना मीटर खरेदी करणे ग्राहकावर बंधनकारक नाही.

८) नवीन जोडणीसाठी आवश्यक सामग्रीची व्यवस्था विद्युत कंपनीला स्वतःच्या पैशाने करावी लागते.

९) नवीन जोडणी घेताना जोडणीच्या प्रकारानुसार भरायची शुल्के “Schedule of charges (SOC) प्रमाणे” आहेत का ? याची खात्री ग्राहकाने नीट तपासून घेतले पाहिजे.

१०) विद्युत कंपनीच्या प्रतिनिधीला आपल्या जागेत प्रवेश देण्यापूर्वी ग्राहक त्याचे ओळखपत्र दाखवण्यास सांगू शकतो तसेच भेटीचे कारण विचारू शकतो.

११) जर जागेच्या मालकीत बदल झाला किंवा ग्राहकाचे निधन झाले तर नवीन मालक किंवा ग्राहकाचा वारस विजेची जोडणी आपल्या नावावर करून घेऊ शकतो.

१२) मालकी बदलली असेल तर जोडणी नावावर करून घेण्यासाठी, फॉर्मए-१ अधिक “यु व एक्स” बरोबर आधीच्या ग्राहकाचे संमतीपत्र सादर करणे आवश्यक आहे, तर निधन झालेल्या ग्राहकाच्या वारसाने इतर वारस असल्यास त्यांच्या “नाहरकत प्रमाणपत्राची” प्रत फॉर्म ए – १ बरोबर सादर करणे आवश्यक आहे. हे फॉर्म विद्युत कंपनीकडे मोफत उपलब्ध आहे.

१३) जोडणी हस्तांतरीत करण्याचा अर्ज मिळाल्यावर विद्युत कंपनीला आपला निर्णय २ बिलिंग चक्रांच्या (देयक चक्रांच्या) आत कळवावा लागतो. तसे न केल्यास कंपनीला कृतीची मानके (sop) नुसार ग्राहकाला दर आठवड्याला रु. १००/-याप्रमाणे नुकसानभरपाई द्यावी लागते.

१४) जोडणी हस्तांतरीत करताना आधीचा मालक सुरक्षा अनामतसुद्धा हस्तांतरीत करण्याचा पर्याय निवडू शकतो किंवा सुरक्षा अनामत परत घेण्याचा पर्याय निवडू शकतो. मात्र जर आधीच्या मालकाकडून थकबाकी येणे असेल तर जोडणीचे हस्तांतरण करण्याच्या अर्जावर प्रक्रिया केली जाणार नाही.


आपला स्नेहांकित ग्राहक हितार्थ सेवक,

अजय भोसरेकर,

मा. अध्यक्ष, (विद्युत)

ग्राहक तक्रार निवारण मंच.

*क्रमशः २*

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.            ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.