मूल नगर परिषद क्षेत्रात अनधिकृत बॅनर, होर्डिंग्जवर बंदी.

 मूल नगर परिषद क्षेत्रात अनधिकृत बॅनर, होर्डिंग्जवर बंदी.



मूल, दीपक देशपांडे 

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगर परिषद मूल क्षेत्रात अनधिकृत बॅनर, होर्डिंग्ज, जाहिराती, पोस्टर्स बाबत नगर परिषद स्तरावर मानक कार्यपद्धती तयार करण्यात आले आहे. त्यानुसार मूल नगर परिषद कार्यालयाकडून बॅनर, होर्डिंग्ज, जाहिराती, पोस्टर्स लावणे संदर्भातील नाहरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी ठिकाणे, दर व विहित कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे.

नगर परिषद मूल क्षेत्रात राज्य शासनाने विकसित केलेल्या IWBP प्रणालीतून (https://mahaulb.in/MahaULB ) क्युआर कोड असलेले परवानगीनेच बॅनर, होर्डिंग्ज लावणे बंधनकारक आहे. विना क्युआर कोड चे बॅनर, होर्डिंग्ज अनधिकृत समजून तात्काळ जप्त केले जातील व फौजदारी कारवाही करण्यात येईल. याबाबत नगर परिषद मूल कार्यालयात तक्रार नोंदवही उपलब्ध असून तक्रारी करिता भ्रमणध्वनी क्रमांक 9834780488 यावर संपर्क साधता येईल.

IWBP प्रणालीतून परवानगी मिळाल्यानंतर प्राप्त झालेल्या क्युआर कोड मध्ये अर्जदाराचे नाव, परवानगी क्रमांक, ठिकाणे, व परवानगीचा कालावधी असतो. तरी सर्व ग्राफिक्स व्यावसायी व नागरिक यांनी रीतसर बॅनर, होर्डिंग्ज परवानगी घेऊन व क्युआर कोड लावूनच उभारावे. असे आवाहन श्री संदीप दोडे, मुख्याधिकारी, नगर परिषद मूल यांनी कळविले आहे.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.          ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.