विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि कौशल्य यांचा योग्य समतोल साधला पाहिजे--प्राचार्य डॉ. अनिता वाळके
विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि कौशल्य यांचा योग्य समतोल साधला पाहिजे--प्राचार्य डॉ. अनिता वाळके
मूल :दीपक देशपांडे
शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित कर्मवीर महाविद्यालय मूल येथे प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने दिनांक ४ जानेवारी ते १२ जानेवारी २०२५ दरम्यान क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
या महोत्सवात आंतर कक्षा स्वयंशासन स्पर्धा, स्वरचित काव्यवाचन स्पर्धा,कथाकथन स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा,वाद-विवाद स्पर्धा, भावगीत स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा,बुद्धिबळ स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पुष्परचना स्पर्धा, पाककला स्पर्धा, एकल नृत्य व समूह नृत्य स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यासोबतच विविध मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या मध्ये क्रिकेट, कबड्डी, १०० मीटर धावणे, गोळा फेक, स्लो सायकलिंग इत्यादी स्पर्धांचा समावेश होता. याच दरम्यान महाविद्यालयात दिनांक १० जानेवारी २०२५ ला मा.सा.कन्नमवार यांच्या जयंती प्रित्यर्थ राज्यस्तरीय वाद-विवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली. तर दिनांक ११ जानेवारी २०२५ ला संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार स्व.वि.तू. नागपुरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय देशभक्तीपर गीत स्पर्धा आयोजित करण्यात आली. तसेच स्व. डॉ. मा.मा. वैरागडे स्मृती प्रित्यर्थ राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अशा विविध स्पर्धांतील विजेत्यांना सन्मानचिन्ह ,रोख व प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप तसेच युवादिन म्हणजे स्वामी विवेकानंद व माॅ जिजाऊ जयंती असा संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्ष व मार्गदर्शक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.अनिता वाळके होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. शिलाताई नरवाडे , सहयोगी प्राध्यापक तथा सिनेट सदस्य चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा, मान. जयश्री गुज्जनवार, शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती मूल, प्रा. चंद्रकांत मणियार सर, पर्यवेक्षक प्रा. बनकर सर, प्रा. डोंगरवार सर उपस्थित होते.प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करून युवा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.त्यांच्या कार्य कर्तृत्वासंबंधी माहिती दिली. तसेच
विद्यार्थी जीवन ही केवळ पुस्तकी ज्ञान मिळवण्याची संधी नसून व्यक्तिमत्त्व घडवण्याचा सुवर्णकाळ आहे. शिक्षणा सोबत कला, क्रीडा आणि सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रातही विद्यार्थीनी सक्रिय सहभाग घेतल्यास त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांगीण विकसित होईल. यासोबतच विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि कौशल्य यांचा योग्य समतोल साधला पाहिजे असे प्रेरणादायी विचार व्यक्त करत या महोत्सवातील विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी प्रा. डॉ. शिलाताई नरवाडे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून प्रेरणादायी मार्गदर्शन केले. आपले ध्येय नेहमी उंच ठेवा. कष्ट चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर कोणतीही अडचण पार करता येते असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी मान. जयश्री गुज्जनवार मॅडम ,प्रा. मणियार सर, प्रा दिनेश बनकर ,प्रा. डोंगरवार सर यांनीही विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनात प्रेरणादायी विचार व्यक्त केले. या समारोपीय कार्यक्रमाचे संचालन प्रा.सागर मासिरकर यांनी केले तर आभार प्रा. सिकंदर लेनगुरे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment