ऑटोला सेफ्टी गेट अनिवार्य करण्यात यावे.
शाळकरी विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या ऑटोला सेफ्टी गेट अनिवार्य करण्यात यावे:- युवासेना कॉलेज कक्ष चंद्रपूर तर्फे प्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर (RTO) यांना निवेदन.
दीपक देशपांडे
शालेय मुलांना घेऊन जाणाऱ्या ऑटोला सेफ्टी गेट नसल्यामुळे आणि शाळेतील लहान-लहान मुले ऑटोमध्ये निट बसत नसल्यामुळे येता-जाता अनेकदा लहान-मोठ्या दुर्घटना होतांना दिसत आहेत, मुलांना घेऊन जाणाऱ्या ऑटोला सेफ्टी गेट अनिवार्य केल्यास भविष्यात होणाऱ्या दुर्घटनेला आपण नक्कीच आळा घालू शकतो.या करीता युवासेना कॉलेज कक्ष चंद्रपुर तर्फे प्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर (RTO) यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली.
यावेळी शिवसेना- युवासेना कॉलेज कक्षाचे आदर्श लडस्कर यांच्यासह सार्थक शिर्के, आदर्श खडसे,हर्षल खनके व रोहन आबंटकर यांची उपस्थिती होती .
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment