लक्षवेधी:-६:-गांजा, मांजा आणि रांज्या.
लक्षवेधी:-६.
गांजा,मांजा आणि रांज्या.
दीपक देशपांडे
मूल शहरासह तालुका आणि चंद्रपूर जिल्हा मागील कित्येक दिवसांपासून गाजतोय तो गांजा तस्करी , त्यातून सुरू असलेली हाणामारी,जीवघेणे हल्ले,त्यात गुंतलेले अल्पवयीन विद्यार्थी,चिनी मांजा,भर वर्दळीच्या ठिकाणी सुरू असलेली विक्री स्थानिक पोलिसांचे अज्ञान आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या धाडीत सापडणारे घबाड आणि निरपराध लोकांच्यामाना कापणे ,पोलिसांनी न केलेल्या कारवाया आणि वनविभागाच्या दूर्लक्षीतपणामुळे होत असलेली (बांबू) रांज्यांची प्रचंड तोड याला वनांची हानी म्हणायची की हीसुद्धा तस्करी म्हणायची हा चर्चेचा स्वतंत्र विषय ठरु शकतो,पण जंगलातून जाणाऱ्या कोणत्याही रस्त्यावर सहज रस्त्याच्या कडेला लक्ष दिले तरी ही राज्यांची तोड लक्ष आकर्षित करुन घेणार नाही तरच नवल ,असा सगळाच सावळागोंधळ सुरू आहे.
हा सर्व प्रकार प्रशासनातील जाणत्या अधिकाऱ्यांना कधी कुणी लक्षात आणून दिला नसेल काय?की जाऊ द्याना साहेब ,बिचाऱ्यांचे पोटापाण्याचा प्रश्न आहे म्हणून हेतूपुरस्सर दूर्लक्ष करायला लावल्या जात आहे? याबाबत विचारमंथन होणे गरजेचे आहे.
नुकतेच मूल शहरात राष्ट्रीय पर्यावरण संमेलन पार पडले या संमेलनात मान्यवरांनी पर्यावरण रक्षणाची आवश्यकता प्रतिपादीत केली आणि आपण जो श्वास घेतो त्यापासून तर बदललेल्या वातावरणामुळे वादळ,चक्रिवादळ ,पूरआणि ढगफुटी पासून तर अती थंडी पर्यंतच्या लाटांपर्यंतचे परिणाम या वृक्षतोडीमुळे सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले , तरीही आपण सर्व काही उघड्या डोळ्यांनी पाहत असूनही कानाडोळा जर करत असू तर.....?
ही सृष्टी नष्ट करण्यासाठी आपणच जबाबदार आहोत हे समजून घेण्याची गरज आहे असे वाटत नाही काय?
घटना घडल्यानंतर कार्यवाही करण्यापेक्षा आधीच कारवाई करता येणे शक्य नाही काय? प्रत्येक गोष्ट फक्त तक्रार आल्यावरच ( ती तक्रार तरी तातडीने घेतली जाते का?घेतलीच तरी त्यावर कारवाई योग्य पद्धतीने केली जाते काय?) चौकशी साठी घेण्याचे नवे आदेश शासनाने निर्गमित केले आहेत की काय?
ही स्थिती कां निर्माण केली जात आहे?ह्यांचे उत्तर शोधण्याची वेळ आली आहे. म्हणून तर हा विषय जनता सरळसोटपणे बोलून दाखवत नाही म्हणून आमच्या कडे लक्षवेधी साठी पाठवला जातोय. विषयाचे गांभीर्य ओळखून यावर तातडीने कारवाई करण्याची आणि योग्य नियोजन करण्याची वेळ आली आहे , याबाबत आमच्या चमूची खात्री पटली आहे.
दररोज मोठ्या प्रमाणात गांजा, मांजा आणि रांज्या यांचा वापर, गैरवापर करून अनेक गैरप्रकार पुढे येत आहेत , त्यावर कारवाई........... होईलच...!
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment