कृषी महाविद्यालय मूल रासेयो शिबीराचे गडीसुर्ला येथे उद्घाटन

 कृषी महाविद्यालय मूल रासेयो शिबीराचे गडीसुर्ला येथे उद्घाटन



मूल ५:-दीपक देशपांडे .

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय मूल आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर *गडीसुर्ला* , ता. मूल, जि. चंद्रपूर येथे *3 ते ९ जानेवारी, २०२५* या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे उद्घाटन *श्री. नंदकिशोर रणदिवे,*  माजी उपाध्यक्ष नगरपरिषद, मुल यांनी केले. आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले कि, शिबिरार्थींनी नवीन कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार गावकार्यांसाठी करणे आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणे व ग्राम विकासात्मक कार्य करावे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे असलेल्या गडीसुर्लाच्या, *सरपंच सौ. शारदाताई संजय येनुरकर* यांनी मार्गदर्शन करतांना सांगतेवेळी शिबिरार्थींनी खुप शिका, मोठे व्हा आणि सतत समाजकार्य करत राहावे अश्या सूचना दिल्या. उद्घाटन कार्यक्रम अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, *डॉ. विष्णुकांत टेकाळे* यांनी हे शिबीर “माझ्या भारताचा युवा आणि डिजिटल साक्षरता” या संकल्पनेवर आधारित आयोजन करण्यात आले आहे व या शिबिरात शिबिरार्थी विविध विषयांवर मार्गदर्शन करतील, तसेच स्वयंसेवकांनी गावातील शेतकऱ्यांच्या सर्व समस्या जाणून घ्याव्या, गावकऱ्यांना विद्यापीठाच्या कृषी तंत्रज्ञानाबाबत माहिती करून द्यावी, शेतकऱ्यांसाठी विद्यापीठाने तंत्रज्ञान विकसित केलेले विविध ॲप त्यांच्या मोबाईल मध्ये प्रस्थापित करून द्यावे व कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यास याप्रसंगी सांगितले. संगानियोच्या अध्यक्ष *सौ.वंदनाताई आगरकाटे* यांनी गावामध्ये राहतांना लागणारी तडजोड बाबत शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. जीवनात नेहमीच तडजोड करावी लागते ते शिबिरार्थीनी अंगीकृत करावी असे सांगितले. *श्री सुरेश टिकले* मुख्याध्यापक, जि. प. शाळा गडीसुर्ला  यांनी शिबिर यशस्वी होण्याकरिता सर्वस्वी सहकार्य करण्याचे आश्वासन या प्रसंगी दिले. सदर उद्घाटनाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी *प्रा. नागेश नवघरे* यांनी केले. 

सदर उद्घाटन कार्यक्रमास *डॉ. रमाकांत गजभिये* , उद्यानविद्या प्रमुख, कृषी महाविद्यालय मुल, *सौ. कारीश्माताई वाढई* , ग्रामपंचायत उपसरपंच, गडीसूर्ला,  २६ रासेयो स्वयंसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते. या सात दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन केले असून त्यामध्ये सकाळी योगासने, प्रार्थना  ग्रामीण समस्या जाणून घेणे,  ग्रामीण विकासचे कामे, विविध पथनाट्य तसेच बौधिक सत्रामध्ये कृषी  विद्यार्थी आणि ग्रामीण विकास परिसंवाद, कृषी क्षेत्रात मोबाईल ॲपचा वापर, मोबाईल ॲपचा बालकांच्या जीवनावर होणारा विपरीत परिणाम, शेंद्रीय शेती काळाची गरज, व्यक्तिमत्व विकास, ग्राहक जागृती काळाची गरज, ग्रामीण उद्योगात राष्ट्रीयकृत बँकांचे योगदान, कृषी क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाची जागरुकता, गावकार्यांच्या सहभागातून ग्राम मूल्यांकन, कृषी क्षेत्रात युवकांचा सहभाग, जनावरांचे लसीकरण अश्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या रासेयो विशेष शिबिरात एकुन २६ शिबिरार्थी सहभागी झाले आहेत. शिबिराच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी *प्रा. नागेश नवघरे, प्रा. मनीषा लवणकर, डॉ. खुशाल राठोड,  डॉ. सुवर्णा नगराळे, डॉ. अक्षय इंगळे व इतर प्राध्यापक* आदींनी परीश्रम घेत आहेत. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *प्रा. मनीषा लवणकर* यांनी केले तर उपस्थितांचे आभार *डॉ. सुवर्णा नगराळे* यांनी मानले.


दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.            ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.