मराठी पत्रकार दिन साजरा.

 मूल येथे मराठी पत्रकार दिन साजरा.

मूल दीपक देशपांडे 




मूल तालुका पत्रकार संघाचे वतीने पत्रकार भवनात मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन व पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करीत पत्रकार दिन साजरा करण्यात आला.

मूल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष,राजू गेडाम , उपाध्यक्ष युवराज चावरे   सचिव विनायक रेकलवार ,माजी अध्यक्ष दीपक देशपांडे,व माजी सचिव गंगाधर कुनघाडकर यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

उपस्थितांनी प्रतिमेचे पूजन करुन बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रती आदरांजली अर्पण करीत त्या काळातील पत्रकारिता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाल्यानंतर आजची बदललेली पत्रकारिता यांवर साधकबाधक चर्चा केली , आणि त्यांच्या कार्याप्रती आदर व्यक्त करुन श्रद्धासुमनांनी सहानुभूती व्यक्त केली व परस्परांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या व समृद्ध पत्रकारिता वृद्धिंगत होईल अशी आशा व्यक्त केली.


दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.            ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.