अखेर प्रदिर्घ पाठपुराव्याला सुयश, दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरित!

 अखेर प्रदिर्घ पाठपुराव्याला सुयश, दुय्यम निबंधक,   कार्यालय प्रशासकीय भवनात  स्थलांतरित!

मूल, दीपक देशपांडे 

गुरुवार दिनांक २३जानेवारी रोजी नोंदणी  उपमहानिरीक्षक तांदळे मॅडम यांचे हस्ते ,जिल्हा मुद्रांक अधिकारी शेळके आणि मूलच्या तहसीलदार मृदूला मोरे मॅडम आणि  पत्रकार तसेच शासकीय कार्यालये स्थलांतरण समितीचे प्रमुख, जागृत ग्राहक राजा या ग्राहक चळवळीचे  प्रमुख दीपक देशपांडे ,  मूलचे दुय्यम निबंधक झाडे,नायब तहसीलदार नंदकिशोर कुंभारे,नायब तहसीलदार ओंकार ठाकरे,नायब तहसीलदार पंदिले यांचे प्रमुख  उपस्थितीत दुय्यम निबंधक कार्यालय (स्थलांतरित करण्याचा) उद्घाटन सोहळा पार पडला.
------------------------------------------------------------
आजच्या कार्यक्रमातील वैशिष्ट्ये:-
मूलचे दुय्यम निबंधक कार्यालय हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे महसूल मिळवून देणारे कार्यालय आहे.:-तांदळे मॅडम.
एकाच छताखाली शासकीय कार्यालये असल्याने जनतेच्या सोयीचे, यासाठी,जनतेची मागणी आणि सामाजिक संस्था, पत्रकार यांचा पाठपुरावा:-मृदूला मोरे, तहसीलदार मूल.
आमच्या अथक पाठपुरावा व सातत्यपूर्ण मागणीला लाभलेले हे अभुतपूर्व यश,हा खऱ्या अर्थाने ग्राहक शक्तीचा विजय:-दीपक देशपांडे.
आज किरायाच्या घरातून इथवर आलोय पण लवकरच आम्ही स्वतःच्या इमारतीत स्थलांतरित होऊ शकतो,कारण जागा मिळाली आहे आणि निधीही मंजूर झाला आहे.:-झाडे, दुय्यम निबंधक मूल.
या कार्यक्रमाला राजकीय मंडळींनी पाठ फिरवली, त्यांची अनुपस्थिती,हा चर्चेचा विषय.
-----------------------------------------------------------
आमच्या हितचिंतकांनी पाठविलेली बातमी आणि मजकूर,जो या बातमीसोबत जोडण्याची विनंती केली आहे.

मूल  शहरातील नोंदणी व मुद्रांक विभागाचे दुय्यम निबंधक श्रेणी१ कार्यालय बऱ्याच वर्षांपासून तहसील कार्यालयापासून बऱ्याच अंतरावर किरायाच्या घरात होते, नंतर प्रशासकीय इमारत बांधकाम पूर्ण झाले तेव्हा या कार्यालयासाठी पहिल्या मजल्यावर एक (ब्लाक )दालन आवंटित करण्यात आले ,मात्र दुय्यम निबंधक कार्यालय हे तळमजल्यावर असावे या विभागाच्या अटिमुळे इतर शासकीय कार्यालये प्रशासकीय भवनात तातडीने स्थलांतरित करण्यात आले मात्र दुय्यम निबंधक कार्यालय हे किरायाच्या घरातच कायम राहिले.

खरेदी विक्रीचे व्यवहार करताना ग्राहकांना बरीच पायपीट करावी लागत होती , परिणामी पत्रकार दीपक देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली शासकीय कार्यालये स्थलांतरण समिती गठीत करण्यात आली आणि सर्व शासकीय कार्यालये प्रशासकीय भवन परिसरात स्थलांतरित करण्याची मागणी जोरकसपणे पुढे ठेवल्या गेली , त्यासाठी शासनदरबारी मूलचे तहसीलदार यांचे माध्यमातून मग नंतर, उपविभागीय अधिकारी मूल यांचे माध्यमातून जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री यांचेकडे वेळोवेळी निवेदने देऊन शहरातील प्रमुख दोन कार्यालये,१) दुय्यम निबंधक कार्यालय आणि २) तालुका कृषी अधिकारी कार्यालय प्रशासकीय भवन परिसरात स्थलांतरित करण्याची मागणी रेटून धरण्यात आली , त्यासाठी , पालकमंत्री ते मुख्यमंत्री अशा वेगवेगळ्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा करण्यात आला.

त्यानंतर दुय्यम निबंधक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना असलेली अडचण समजून घेऊन तळमजल्यावर असलेल्या दालनासाठी तत्कालीन तहसीलदार रवींद्र होळी यांची व उपविभागीय अधिकारी खेडकर साहेब यांचेशी संपर्क साधून उपनिबंधक कार्यालय सहकारी संस्था हे कार्यालय पहिल्या मजल्यावर स्थलांतरित करण्याची मागणी करुन हे दालन दुय्यम निबंधक कार्यालयासाठी उपलब्ध करून देण्यात यावे ही मागणी करुन त्यासाठी आग्रह धरुन त्याचा पाठपुरावा केला गेला.

मूलचे उपविभागीय अधिकारी  म्हणून मेश्राम साहेब रुजू झाले, त्यांनाही  याबाबत माहिती दिली आणि नंतर सहकार विभागाने तयारी दाखवली व त्यांचे कार्यालय आवश्यक सुधारणा करून पहिल्या मजल्यावर स्थलांतरित करण्यात यश मिळाले  आता प्रश्न होता दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरित करण्याचा तर त्यासाठी तत्कालीन दुय्यम निबंधक मॅडम  यांनी प्रत्यक्ष भेट देऊन दालनाची पाहणी करुन आवश्यक सुधारणा व सूविधा बांधकाम विभागाच्या सहकार्याने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या .

बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रशांत वसुले यांनी पाहणी करून आवश्यक सुधारणा करण्यासाठी प्रस्ताव पाठवून मंजूरी मिळवली व काम पुर्ण केले ,आता दुय्यम निबंधक कार्यालय लवकरच स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करणार अशी ग्वाही दुय्यम निबंधक मॅडम ने दिली,व काही दिवसांतच त्या लाचलुचपत विभागाच्या कचाट्यात सापडलेल्या त्यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर गेली , तहसीलदार रवींद्र होळी यांची बदली झाली व मृदूला मोरे मॅडम रुजू झाल्या निवडणूक प्रक्रिया सुरू झाली, आणि हे प्रकरण लांबतच गेले ,लोकसभा निवडणूक संपली विधानसभा निवडणुक आली  तर उपविभागीय अधिकारी मेश्राम यांचीही बदली होऊन चरडे साहेब रुजू झाले ,या सर्व प्रकारात बराच काळ लोटून गेला,मात्र यादरम्यान कृती समितीचे वतीने पाठपुरावा कायमच ठेवला होता परिणामी आता कुठे त्याला सुमुहूर्त लागले आणि शेवटी दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरित झाले.

यादरम्यान वेगवेगळ्या संघटना , राजकीय मंडळी यांनीही यासाठी मागणी आणि निवेदने देऊन श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला परंतू तो शासकीय कार्यालये स्थलांतरण कृती समितीने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच साध्य झाल्याने या कृती समितीचे मागणीला खऱ्या अर्थाने यश प्राप्त झाले आहे.

शहरातील नागरिक, मुद्रांक विक्रेता  दस्तलेखक, खरेदी विक्रीचे व्यवहार करणारे ,सेतू संचालक या सगळ्यांनीच या स्थलांतराचे स्वागत करीत आनंद व्यक्त केला आहे.

या उद्घाटन सोहळ्यात दुय्यम निबंधक संचालक राऊत ,ऑपरेटर गणेश उइके, ग्राहक चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते  रमेश डांगरे , दिलीप कटलावार,प्रमोद मशाखेत्री कर्मचारी वृंद, स्टॅम्प पेपर विक्रेता गणविर, लोनबले, बंडावार दस्तलेखक,तसेच मूल शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती,तसेच जेष्ठ नागरीक, महिला आदी उपस्थित होते.

तहसील कार्यालयापासून  लांब असल्यामूळे, नागरिक  व विशेष  करुन ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर हे कार्यालय आता मूल तहसिल कार्यालयातील प्रशासकीय भवानाच्या इमारतीमध्ये आज स्थलांतरीत करण्यात आले आहे. याठिकाणी पक्षकारांसाठी हवेशीर प्रतिक्षालय, पाण्याची सोय,स्वच्छतागृह, आणि लागूनच  दस्तऐवज, दस्तलेखक आणि दस्त मिळण्याची सोय उपलब्ध झाली आहे , तसेच येणाऱ्या जाणाऱ्यांवर तिसरा डोळा नजर ठेवून असणार असल्याने प्रत्यक्ष तहसीलदार  यावर  लक्ष ठेवून असणारच आहेत परिणामी गैरव्यवहार आणि गैरप्रकार टाळण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली जाणार आहे. ही विशेष उल्लेखनीय बाब आहे.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.