पतसंस्थेच्या कर्मचा-यांना वेतन आयोग लागू करा - पत्रपरिषदेत मागणी
पतसंस्थेच्या कर्मचा-यांना वेतन आयोग लागू करा -पत्रपरिषदेत मागणी
मूल :- दीपक देशपांडे
पतसंस्थेच्या कर्मचा-यांना शासनाच्या वेतन आयोगा मध्ये समाविष्ठ करण्यात यावे तसेच पतसंस्था कर्मचा-यांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी तक्रार निवारण मंडळ स्थापन करण्यात यावे अशी मागणी विदर्भस्तरीय नागरी व ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था कर्मचारी संघाने आयोजित पत्रकार परिषदेतून केली.
मूल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली व्यथा बोलून दाखविली. सहकारी पतसंस्था या राज्यातील आर्थिक क्षेत्राच्या कणा आहेत,हाच कणा शासनदरबारी दुर्लक्षित होत आहे.पतसंस्थेमध्ये कार्यरत कर्मचा-यांना शासकीय लाभ मिळत नाही. त्यासाठी कर्मचा-यांना नवी दिशा आणि बळ मिळण्याच्या दृष्टीने मूल मध्ये प्रथम त्रैमासिक अधिवेशन घेण्यात आल्याचे संघाने सांगितले. भारतीय मजदूर संघाच्या मार्फतीने आमचा लढा सुरू आहे.अधिवेशनामध्ये कर्मचा-यांच्या मागण्या आणि अडचणी यावर प्रकाश टाकण्यात आला. सहा ठराव घेण्यात आले ,ते ठराव शासनदरबारी मांडल्या जाणार आहे.एकत्रीत पणे लढा देता यावा यासाठी नागपूर,चंद्रपूर, भंडारा,गोंदीया गडचिरोली, जिल्हयातील पाचशेच्या वर पतसंस्थेचे कर्मचारी अधिवेशनाला उपस्थित होते असे संघाने यावेळी सांगितले.
पतसंस्था कर्मचा-यांसाठी तक्रार निवारण मंडळ स्थापन करण्यात यावे,नियामक मंडळाच्या समिती मध्ये आणि पतसंस्थेच्या उपविधी दुरूस्ती समिती मध्ये पतसंस्थेच्या कर्मचारी संघटनेचा प्रतिनिधी नेमण्यात यावा ,ग्रॅज्युईटीची रक्कम एलआयसी मध्ये गुंतवणूक करावी,भविष्य निर्वाह निधीची पेन्शन प्रत्येक कर्मचा-याला ७५०० रूपये ते १०,०००₹. देण्यात यावे, वेतन आयोग लागू करावा, प्रति संस्था शाखा कर्मचारी संच मान्यता निर्धारीत करून संस्था उपविधी मध्ये समाविष्ठ करावे,शासनाच्या सहकार खात्याच्या पदभरती मध्ये पतसंस्थेतील कर्मचा-यांना १० टक्के कर्मचारी आरक्षण देण्यात यावे असे सहा ठराव अधिवेशनात पारित करण्यात आल्याची माहिती संघाच्या पदाधिका-यांनी सांगितली.
पत्रकार परिषदेला विदर्भ प्रांत अध्यक्ष अशोक पिसे,उपाध्यक्ष तुकाराम गायकवाड,सुरेश शास्त्रकार, विनोद बारापात्रे,राजू डहारे, आदि संचालक उपस्थित होते.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment