ग्राहक दर्पण:- वीज ग्राहका जागा हो. १

 ग्राहक दर्पण:-

वीज ग्राहका जागा हो. १




ग्राहकांनी “नवीन विद्युत पुरवठा व नावात बदल करणे” बाबत नोंद घ्यावी असे काही :-

१) नवीन जोडणीसाठी अर्ज करणारा अर्जदार विद्युत कंपनीचा ग्राहक मानला जातो.

२) ग्राहकाला आवश्यक असलेले सर्व अर्ज कंपनीच्या कोणत्याही कार्यालयात मोफत उपलब्ध असतात. तसेच सर्व प्रकारचे अर्ज कंपनीच्या वेबसाईटवर डाऊनलोड करता येण्याजोग्या स्वरुपात उपलब्ध असणे बंधनकारक आहे. 

३) ग्राहकाने आवश्यक कागदपत्रांच्या छायाप्रती अर्जाला जोडाव्यात (पण अर्जासोबत मूळ प्रती जोडू नयेत पण सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.)

४) ग्राहकाने प्रत्येक अर्जाची पोचपावती नेहमीच आग्रहपूर्वक मागितली / घेतली पाहिजे.

५) ग्राहक आपल्या अर्जाच्या सद्यस्थितीची माहिती आणि जोडणी देण्यास विलंब झाला असेल तर त्याची कारणे याबद्दल कंपनीकडून लेखी स्पष्टीकरणाची मागणी करू शकतो.

६) नवीन जोडणी देण्यापूर्वी जागेचे मूल्यांकन करण्यासाठी ग्राहकाला काहीही पैसे द्यावे लागत नाहीत.

आपला स्नेहांकित ग्राहक हितार्थ सेवक,

अजय भोसरेकर,

मा. अध्यक्ष, (विद्युत), ग्राहक तक्रार निवारण मंच

क्रमशः---१

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.            ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.