लक्षवेधी:-५.मूल-नागपूर बससेवा !
लक्षवेधी:-५. मूल नागपूर बससेवा!
दीपक देशपांडे
मूल शहर हे धान उत्पादक झाडी पट्टितील चंद्रपूर गडचिरोली या दोन जिल्ह्यातील मध्यवर्ती शहर असून धान्य विक्रीची सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणून सगळीकडे ओळख आहे.
येथून राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी बससेवा सुरू आहे आणि येथून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या भरमार आहे.
येथून दर अर्ध्या तासाने नागपूर साठी खाजगीबसेस खचाखचप्रवासी भरुन जातात , बसचालक वर्षभरात दुसरी बस दारात उभी करतात मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला प्रवासी मिळत नाही , बसेस घाट्यात चालतात म्हणून नियमीत चालणाऱ्या बसेसही बंद करून महामंडळ नेमकं काय साध्य करु इच्छित आहेत ,हे काही कळत नाही,अशी प्रतिक्रिया जनतेतून उमटू लागली आहे.
खाजगी बस चालकांचे राजकीय नेते- मंडळींशी असणारे हितसंबंध लक्षात घेता कुठे त्यामुळेच तर ही बससेवा बंद करण्यात आली आहे की काय?अशी शंकाही या निमित्ताने प्रवाशांनी आमच्या सोबत चर्चा करताना उपस्थित करीत मूल-नागपूर बससेवा तातडीने सुरू करण्याची आग्रही भूमिका घेत तशी मागणी केली आहे.
मूल नागपूर बससेवा सुरू करण्याची मागणी केवळ मूलवासीय जनतेनेच नाही तर मार्गातील राजोली सिंदेवाही ,तळोधी येथील विविध प्रवासी , व्यापारी , उद्योजक, विद्यार्थी , नौकरदार यांनी सुद्धा तेवढ्याच समर्थपणे केली आहे.
एकीकडे गडचिरोली वरुन नांदेड, यवतमाळ, उमरखेड,नेर, वाशिम,वर्धा ,आर्वी, तर दुसरीकडे चंद्रपूर वरुन गडचिरोली, ब्रम्हपुरी ,वडसा , साकोली,भंडारा , गोंदिया,तुमसर अशा लांब पल्ल्याच्या गाड्या चालवल्या जात असताना, नागपूसाठी प्रवाशांची प्रचंड मागणी असताना काही दिवस बस चालवून बंद करण्याचा निर्णय वारंवार कां घेतला जातो आहे ? हे न कळण्यासारखे आहे.
बसस्थानकासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून बऱ्याच त्रुटी असलेले बसस्थानक उभे करण्यापेक्षा सर्वसामान्य नागरिकांच्या मागणीचा विचार करीत मूल नागपूर बससेवा सुरू करण्याची मागणी शासनाच्या कोणत्याच स्तरांतील अधिकारी, नेतेमंडळी,विरोधकांनाही दिसू नयेत आणि हा आवाज बुलंद करीत ती मागणी पुढे रेटली जाऊ नये ,याचेच वाईट वाटते आणिराजकीय अपरिपक्वतेची चिड येते असे उद्गार जनतेच्या छुप्या आक्रोशातून आम्ही प्रत्यक्ष अनुभवले आणि म्हणूनच हा विषय मार्गी लावण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनिशी आणि या विषयावर नानाविध प्रवासी, वेगवेगळ्या संघटना, राजकीय अभ्यासक, विश्लेषक यांचा विचार समजून घेऊन त्याची शहानिशा करीत हा विषय लक्षवेधी साठी पुढे ठेवत आहोत.
कुठेतरी न्यायाचा अंधूक किरण अजूनही शिल्लक आहे याची खात्री पटली आहे म्हणुनच हा विषय विचारार्थ शासनदरबारी पोहोचला पाहिजे यासाठी ग्राहक संघटनेची मदत घेत प्रवासी महासंघाचे माध्यमातून हा विषय चर्चेसाठी समोर ठेवला आहे.
मूल तालुका *जागृत ग्राहक राजा* याविषयी आपले आणि सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे शासनाच्या पटलावर पुढे ठेवून जनतेच्या मनातील भाव भावनांचा आदर करुन ही मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल अशी अपेक्षा ग्राहक संघटनेचे वतीने या निमित्ताने व्यक्त केली गेली आहे.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

मुल वासीय जनतेची रास्त मागणी आपण प्रकाशित केलेली आहे.मुल नागपूर बस अत्यावश्यक बाब असल्याने प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे अन्यथा जन आंदोलन नक्कीच आहे.
ReplyDeleteरास्त मागणी आहे. सरकारचे लक्ष वेधले पाहीजे
ReplyDelete