शेतकरी/ग्राहक राजा जागा हो. १.

शेतकरी /ग्राहक राजा जागा हो.....१.

MahaDBT योजनेचा उद्देश

MahaDBT Farmers Scheme 2024    महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले राज्यातील शेतकऱ्यांसाठी (MahaDBT) हे महत्त्वाचे आणि फायदेशीर पोर्टल आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे सामाजिक आणि आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना सशक्त आणि स्वावलंबी बनविण्यासाठी महाराष्ट्र शासन सातत्याने प्रयत्नशील असते. त्यासाठी राज्य सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू करत असतात.

  • महाडीबीटी किसान पोर्टल योजनेचा उद्देश त्यात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणे हा आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन तंत्र शिकण्यासाठी सवलतीच्या दरात शेतीमध्ये वापरलेली उपकरणे खरेदी करता येणार आहेत.



कृषी योजना:-

शेतकरी वर्गासाठी राज्य शासनाच्या अनेक योजना उपलब्ध आहेत.

माती,बियाणे यंत्रे,    सिंचन, तंत्रज्ञान, पत, विमा, पिकाला संरक्षण आणि विपणन हे शेतीशी संबंधित महत्वपूर्ण घटक आहेत. तुम्हाला याबाबत सहाय्य हवे असल्यास राज्य सरकारने देऊ केलेल्या विविध योजनांबाबत जाणून घेणे महत्त्वाचे आहे.त्यापैकी काही महत्त्वाच्या योजना.


राष्ट्रीय कृषी बाजार - eNAM:-
नॅशनल ॲग्रीकल्चर मार्केट किंवा ई-नाम हा भारतातील कृषी उत्पादनासाठीचा ऑनलाइन खरेदी – विक्री मंच आहे. हा मंच शेतकरी, व्यापारी आणि खरेदीदारांना उत्पादनाचे ऑनलाइन व्यवहार करण्याची सुविधा प्रदान करतो. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला दर मिळवून देण्याबरोबरच उत्पादनांच्या फायदेशीर विपणनासाठी सुद्धा हा मंच उपयुक्त ठरतो आहे.

शेतकऱ्यांव्यतिरिक्त, कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापारी, शेतकरी उत्पादक संस्था आणि मंड्या या मंचाचे भाग आहेत. नोंदणीसाठीची मार्गदर्शक तत्त्वे वाचून घ्या आणि या मंचावर नाव नोंदणी करा. या मंचावर व्यवहार करण्यात आलेल्या उत्पादनांची यादीही तुम्हाला पाहता येईल. त्यामुळे दररोजचे बाजार भाव सुद्धा आपल्याला माहिती होतील व योग्य भावात आपला उत्पादित शेतमाल विक्री करता येईल.


अधिक तपशीलांसाठी eNAM संकेतस्थळाला भेट द्या. तुम्ही eNAM अ‍ॅपसुद्धा डाउनलोड करू शकता.


दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.             ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.