शेतकरी/ग्राहक राजा जागा हो.३.शेतकरी ‘अ‍ॅग्रीस्टॅक’ योजनेखाली समृद्ध होतील

 शेतकरी/ ग्राहक राजा जागा हो...३

शेतकरी ‘अ‍ॅग्रीस्टॅक’ योजनेखाली समृद्ध होतील











मूल, दीपक देशपांडे 

ॲग्री स्टॅक ही केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांपर्यंत सरकारच्या योजना पोहोचवणे हा आहे. या योजनेत डिजिटल पद्धतीचा वापर करून शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत केली जाते.

सध्या या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यात प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी जलद व व्यापक प्रभाव निर्माण होईल.

अ‍ॅग्रीस्टॅक योजना शेतकऱ्यांच्या खात्यांना अपडेट करेल आणि शेतकऱ्यांची सर्व माहिती एका क्लिकवर सरकारला उपलब्ध करून देईल. त्यामुळे विविध योजनांचा फायदा शेतकऱ्यांना सोप्या पद्धतीने मिळेल, असे मूल तालुका कृषी अधिकारी सुनील कारडवार यांनी सांगितले.

महाराष्ट्रात ही योजना कशी काम करेल?

माहितीच्या आधारे शेतकऱ्यांपर्यंत विविध योजनांचा लाभ पोहोचविणे सोपे होईल. शेतकऱ्यांना वारंवार पडताळणी करण्याची गरज राहणार नाही. हा उपक्रम १६ डिसेंबरपासून महाराष्ट्रातील गावांमध्ये राबवला जात आहे.

डिजिटल ओळखपत्राचा उपयोग

शेतकऱ्यांना अ‍ॅग्रीस्टॅक योजनेंतर्गत डिजिटल ओळखपत्र दिले जाणार आहे. हे कार्ड विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी उपयोगी ठरणार आहे.

शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा फायदा प्रभावीपणे आणि जलदगतीने मिळावा यासाठी डिजिटल सेवांचा वापर केला जाणार आहे.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.          ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.