प्रवासी भारतीय दिवस.
प्रवासी भारतीय दिवस
दीपक देशपांडे
दरवर्षी भारतामध्ये ९ जानेवारी रोजी साजरा केला जातो. ९ जानेवारी १९१५ रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून मुंबईमध्ये परतले होते. ह्यापित्यर्थ २००३ सालापासून दरवर्षी अनिवासी भारतीय नागरिकांच्या भारताच्या प्रगतीमधील योगदानासाठी प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जात आहे. ह्याचे आयोजन भारत सरकारचे अनिवासी भारतीय कार्य मंत्रालय (Ministry of Overseas Indian Affairs) व उत्तर पूर्वी क्षेत्र विकास मंत्रालय (Ministry for Development of North Eastern Region), फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री ह्यांच्या मार्फत केले जाते. ७ ते ९ जानेवारी दरम्यान भारतामधील एखाद्या शहरात प्रवासी भारतीय दिवसानिमित्त अनेक सोहळे व कार्यक्रम आयोजिiत केले जातात.
२०१४ सालच्या बाराव्या प्रवासी भारतीय दिवसाला ५१ देशांमधील सुमारे १,५०० प्रतिनिधींनी हजेरी लावली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ह्यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
आजवरचे प्र्रवासी भारतीय दिवस, कुठे साजरे झाले आहेत.
- २००३:-१ला प्रवासी भारतीय दिवस नवी दिल्ली
- २००४: २रा प्रवासी भारतीय दिवस नवी दिल्ली
- २००५: ३रा प्रवासी भारतीय दिवस मुंबई
- २००६: ४था प्रवासी भारतीय दिवस हैदराबाद
- २००७: ५वा प्रवासी भारतीय दिवस नवी दिल्ली
- २००८: ६वा प्रवासी भारतीय दिवस नवी दिल्ली
- २००९: ७वा प्रवासी भारतीय दिवस चेन्नई
- २०१०: ८वा प्रवासी भारतीय दिवस नवी दिल्ली
- २०११: ९वा प्रवासी भारतीय दिवस नवी दिल्ली
- २०१२: १०वा प्रवासी भारतीय दिवस जयपूर
- २०१३: ११वा प्रवासी भारतीय दिवस कोचीन
- 2014: १२वा प्रवासी भारतीय दिवस नवी दिल्ली
- २०१५: १३वा प्रवासी भारतीय दिवस गांधीनगर
- २०१७: १४ वा प्रवासी भारतीय दिवस बॅंगलोर
- २०१९: १५ वा प्रवासी भारतीय दिवस वाराणसी
- २०२१:-१६वा प्रवासी भारतीय दिवस, सिंगापूर
- २०२३:-१७वा प्रवासी भारतीय दिवस इंदोर
- २०२५:- १८वा प्रवासी भारतीय दिवस भुवनेश्वर

Comments
Post a Comment