कृषी महाविद्यालय मूल अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची पंचवीसावी बैठक संपन्न*

 कृषी महाविद्यालय मूल अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची पंचवीसावी बैठक संपन्न











मूल २५: दीपक देशपांडे 

कृषी महाविद्यालय, मूल आयोजित *पंचवीसावी* शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची बैठक दिनांक २२ जानेवारी, २०२५ रोजी ग्राम *चितेगांव* ता. मूल जि. चंद्रपूर येथे संपन्न झाली. या प्रसंगी कृषी महाविद्यालय, मूलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विष्णुकांत टेकाळे, गावाचे उपसरपंच श्री हरिदास गोहणे, प्रगतशील शेतकरी श्री अरविंद जोशी, इतर शेतकरी बांधव तसेच कृषी महाविद्यालय, मूल येथील विषयतज्ञ मंडळी उपस्थित होती. सर्वप्रथम कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता यांनी *कृषी महाविद्यालय, मूल निर्मित गांडूळखत व गांडूळपाणी* बॉटल चितेगांव येथील उपसरपंच यांना  *भेट* स्वरुपात दिली.  या बैठकीत मुख्यतेने “ *रब्बी पिकातील एकात्मीक कीड व रोग व्यवस्थापन* ” या विषयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता *डॉ. विष्णुकांत टेकाळे* यांनी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट शेतीकडे वळावे, विविध पीकनिहाय गट तयार करावे त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य बाजार भाव मिळेल. केवळ धानपिकावर अवलंबून न राहता, कडधान्य, तृणधान्य, फुलशेती व विविध भाजीपाला पिकांची लागवड करावी असे सांगितले, तसेच कृषी विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या कृषिसंवादिनीबाबत सविस्तर माहिती दिली व विद्यापीठाचे तंत्रज्ञान असलेली कृषिसंवादिनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्यांना माहितीकरिता ठेवावे असे याप्रसंगी सांगितले. *डॉ. अश्विनी गायधणी,* उद्यानविद्या विषयतज्ञ, यांनी कांदा लागवड तंत्रज्ञान बाबत मार्गदर्शन केले. त्यामध्ये कृषी विद्यापीठ, अकोला ने विकसित केलेली “अकोला सफेद” या वाणाबाबत सविस्तर माहिती दिली. *प्रा. देवानंद कुसुंबे* कृषि विद्या विषयतज्ञ यांनी उन्हाळी धान व हरभरा पिकाचे लागवड तंत्रज्ञान, कीड व रोगांचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले, तसेच शेंद्रीय शेतीमध्ये गांडूळखत व गांडूळपाणी बनविण्याच्या प्रक्रियेबाबत माहिती दिली. त्यानंतर *डॉ. प्रविणा बरडे* , वनस्पतीरोग विषयतज्ञ, यांनी  उन्हाळी धान व भाजीपाला पिकांवरील विषाणुजन्य रोग व किडीबाबत मार्गदर्शन केले आणि उन्हाळी धान पिकामधील खोडकिडा, पाने गुंडाळणारी अळी, लष्करी अळी व तुडतुडे ईत्यादी किडीचे एकात्मिक व्यवस्थापनाबद्दल माहिती दिली, तसेच जैवीक खते, ट्रायकोडर्मा आणि जैविक विघटक याबाबत सविस्तर माहिती दिली. 

सदर कार्यक्रमास एकुण *५१ शेतकरी* व *५ शास्त्रज्ञ* उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संचालन केले व उपस्थितांचे आभार प्रा. मनीषा लवणकर यांनी मानले.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.