ग्राहक जागृती! दीपक देशपांडे गडीसुर्ला येथे *ग्राहक जागृती काळाची गरज* या विषयावर मार्गदर्शन करणार.

 ग्राहक जागृती!

दीपक देशपांडे गडीसुर्ला येथे *ग्राहक जागृती काळाची गरज* या विषयावर मार्गदर्शन करणार.

मूल,डीडीन्यूजब्यूरो

मूल,डीडीन्यूजब्यूरो.ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला मात्र याबाबत समाजात पाहिजे तशी प्रसिद्धी देण्यात आली नाही, परिणामी पदोपदी ग्राहकांची फसवणूक सुरु असताना ग्राहक संरक्षण अधिनियम आणि ग्राहकांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते दीपक देशपांडे मूल यांना *ग्राहक जागृती काळाची गरज* या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मूल तालुक्यातील गडीसुर्ला येथे  रासेयोचे संयोजकांकडून आमंत्रित करण्यात आले आहे.                  कृषी महाविद्यालय मूल द्वारा आयोजित राष्ट्रीय सेवा योजना वार्षिक साप्ताहिक शिबिर गडीसुर्ला येथे सुरू आहे , यानिमित्ताने महाविद्यालयाच्या वतीने दररोज सकाळी योगासने, प्राणायाम, व ग्रामस्वच्छता व श्रमदानादी कार्य केले जात आहे.दुपारच्या सत्रात वेगवेगळ्या विषयांवर विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले असून याचाच एक भाग म्हणून बुधवार दिनांक ०८/०१/२०२५रोजी दूपारी ३वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील ग्राहक चळवळीतील एक  नाव  दीपक देशपांडे यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने ग्रामीण भागातील जनतेला ग्राहक, ग्राहक चळवळ , ग्राहक संरक्षण अधिनियम , फसवणूक व ते टाळण्यासाठी उपाययोजना याबाबत मार्गदर्शन दीपक देशपांडे व चमू उपस्थित ग्रामीणांना करणार आहेत .





 














दिनांक ४/०१/२०२५रोजी सुरू झालेले हे शिबिर गुरुवारी दिनांक ९/०१/२०२५ रोजी दुपारी समाप्त होणार आहे , आजपर्यंत या मंचावरुन उद्घाटन समारंभ, विद्यार्थी परिसंवाद,(कृषी विद्यार्थी आणि ग्रामीण विकास), कृषी क्षेत्रात करीअर, रोजगाराच्या संधी व आव्हाने, महिला सबलीकरण, ग्रामीण विकास कार्यात युवकांचे योगदान, कृषी क्षेत्रात मोबाईल ॲप्सचा वापर , मोबाईलचा बालकांच्या मनावर होणारा परिणाम, सेंद्रिय शेती काळाची गरज , व्यक्तीमत्व विकास,      ग्राहक जागृती काळाची गरज  आणि ग्रामीण उद्योगात राष्ट्रीयकृत बॅंकांचे योगदान यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन आणि दिनांक ९/०१/२०२५ रोजी समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्राहक जागृती साठी हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा असल्याने ग्रामीण भागातील जनतेने या कार्यक्रमात सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा  असे आवाहन गडीसुर्ला व परिसरातील जनतेला  संयोजकांतर्फे  करण्यात आले आहे.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.          ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.