ग्राहक दर्पण:- वीज ग्राहका जागा हो. ३

 ग्राहक दर्पण:-

वीज ग्राहका जागा हो. ३. 

१) ग्राहकाच्या जागी लावलेला मीटर शक्यतो विद्युत कंपनीच्या मालकीचा असावा नवीन विद्युत जोडणी घेण्याच्या वेळी नवीन मीटरचे पैसे देणे ग्राहकावर बंधनकारक नाही.

२) कोणत्याही परिस्थितीत कंपनीने मीटर बॉक्स स्वतःच्या खर्चाने बसवावा.

३) कृषी ग्राहकांसाठी किमान ३ महिन्यातून एकदा आणि इतर सर्व ग्राहकांसाठी किमान २ महिन्यातून एकदा विजेच्या मीटरची नोंद घेणे विद्युत कंपनीवर बंधनकारक आहे.

४) मीटर बसवलेली जागा नोंद घेण्याच्यादृष्टीने सोयीची असल्याचे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. तसे नसल्यास ग्राहकाच्या आवारातच दुस-या जागी मीटर बसवून घेता येतो.

५) ग्राहकाला मीटरच्या अचूकतेबद्दल शंका असेल तर त्याने मीटरची तपासणी करून घ्यावी आणि तपासणी अहवालाच्या प्रतीची मागणीसुद्धा करावी.

६) मीटरची तपासणी कंपनीच्या सुविधा केंद्रात किंवा आयोगाने अधिकृत केलेल्या केंद्रात करता येते. 

७) सर्व मीटरची देखभाल आणि तपासणी करण्याची जबाबदारी संपूर्णपणे विद्युत कंपनीची आहे.

८) केवळ मीटरचे तुटलेले सील ग्राहकाने विजेचा अनधिकृत वापर केल्याचे दर्शवत नाही. मीटरची तपासणी केल्यावरच हे सिद्ध करता येते.

९) जर मीटर जळला असेल किंवा चोरीला गेला असेल, तर त्याची किंमत ग्राहकाला भरावी लागते.


आपला स्नेहांकित ग्राहक हितार्थ सेवक.

अजय भोसरेकर,

मा. अध्यक्ष, (विद्युत)

ग्राहक तक्रार निवारण मंच,

क्रमशः ३.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.          ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.