मूल मध्ये राष्ट्रीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन
मूल मध्ये राष्ट्रीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन
मूल:- दीपक देशपांडे
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था ,मूल शाखेच्या वतीने येथील कन्नमवार सभागृहात रविवारी तृतीय राष्ट्रीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या स्वागताध्यक्षा संस्थेच्या महिला उपाध्यक्षा तेजस्विनी नागोसे या आहेत. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.संस्थेेचे अध्यक्ष सुयोग धस,खा.प्रतिभा धानोरकर,सिने अभिनेते जयराम नायर,राष्टीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर,आ.विजय वडेटटीवार,आ.सुधाकर अडबाल,जितेंद्र रामगावकर,संतोष रावत, उपविभागीय अधिकारी अजित चरडे यांची प्रमूख उपस्थिती लाभणार आहे.दोन सत्रामध्ये संमेलनाचे आयोजन आहे.पर्यावरणाचा होणार -हास व त्यावरील उपाययोजना या विषयावर खगोल शास्त्रज्ञ सुरेश चोपणे यांचे तर, पर्यावरण संवर्धन व मानवाची जबाबदारी या विषयावर चंदू पाटिल मारकवार यांची व्याखाने होणार आहे. यावेळी पर्यावरण क्षेत्रात काम करणा-यांचा गौरव करण्यात येणार आहे. राष्टीय पर्यावरण संमेलनाचा पर्यावरणवादी आणि नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे. याबाबत आयोजकांनी पत्रकार परिषद घेवून संमेलनाची रूपरेषा सांगितली.पत्रकार परिषदेला संस्थेतंर्गत महिला उपाध्यक्षा तेजस्विनी नागोसे, मूल शाखेच्या तालुका अध्यक्ष मिरा शेंडे,रत्ना चौधरी,मंगला संकूरवार,श्रीरंग नागोसे,गुरूदास चौधरी,किसन खोब्रागडे उपस्थित होते.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment