स्व.कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा.

 स्व.कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांचा जयंती सोहळा मोठ्या उत्सवात साजरा 
















मूल :  दीपक देशपांडे 
१० जानेवारी २०२५

 बेलदार समाज बहुउद्देशीय संस्था मूलचे यशस्वी आयोजन                   

 डॉ.वैशाली बेझलवार व नायब तहसीलदार विकास     जीडगेलवार समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मान

   मूल बेलदार समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मूल च्या वतीने स्व. कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची १२५ वी जयंती सोहळा मूल शहरात १० जानेवारी २०२५ मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आली. 

दादासाहेब कन्नमवार यांची जयंती उत्सव मिरवणूक बेलदार समाज भवन सोमनाथ रोड पासून तर मा.सा.कन्नमवार सभागृह पर्यंत काढण्यात आली. समारंभाचे उद्घघाटक डॉ.मनोहरराव मुद्देशवार, व समारंभाचे अध्यक्ष माजी जिल्हा आरोग्याधिकारी विजय कारगीरवार, प्रमुख अतिथी डॉ.सुभाष रेड्डीवार, प्रा.मारोतराव पुल्लावार यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन ,पुष्पमाला अर्पण करण्यात आली. मिरवणूक, कन्नमवार सभागृह येथील पूर्णाकृती पुतळ्याचे माल्यार्पण करण्यात आले. 

सांस्कृतिक कार्यक्रम,१० वी १२ वी मधील प्राविण्य प्राप्त विदयार्थ्याचा सत्कार, सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार, सोबतच समाज भूषण गौरव पुरस्कार म्हणून डॉ. वैशाली बेझलवार व नायब तहसीलदार विकास जिडगेलवार यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. 

आपला बेलदार  समाज अतिशय अल्पसंख्यांक असूनही मां.सां.उर्फ कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सारखा हिरा या समाजातून निर्माण झाला. याचा अभिमान ठेऊन सर्व समाज बांधवांनी आठवण ठेऊन समाज कार्यासाठी पुढाकार घ्यावा असे मनोगत अध्यक्ष डॉ. मनोहरराव मुद्देशवार यांनी समाज बांधवांना केले.                       
  वन मिनिट शो,रांगोळी स्पर्धा  विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, यांत असंख्य बेलदार समाज बांधव महिला युवक युवतीं यांनी सहभाग घेतला.                                           

आयोजित विविध स्पर्धामध्ये संस्थेच्या वतीने  घेण्यात आलेल्या स्पर्धकांना प्रथम, द्वितीय, तृतीय रोख बक्षीस देण्यात आले. 

सांस्कृतिक कार्यक्रमाचे जयंती सोहळ्याला उत्साह दिसून आला. मूल बेलदार समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मूलचे अध्यक्ष श्री संदीप कारमवार यांनी प्रास्ताविक केले. संचालन सुषमा कमिडवार, सचिन बल्लावार यांनी केले. आभार विवेक कमिडवार यांनी मानले. 

कार्यक्रमाला  उपाध्यक्ष श्री प्रशांत देशकर,महेश गाजुलवार, विवेक मुत्यलवार, सचिन बोर्डावाऱ, बंडू साखलवार सुरेश गुज्जन्वार, संतोष आकुलवार, महिला पदाधिकारी सोनल श्रिगिरवार, पायल सोनुलवार, सुषमा कामिडवाऱ, पल्लवी कन्नमवार, राधिका बुक्कावार , यांचेसह संस्थेचे सर्व पदाधिकारी महिला,युवक युवती यांनी अथक परिश्रम घेऊन सहकार्य केले.


दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.          ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.