वीज ग्राहका जागा हो. १०. विद्युत ग्राहकांनो हे आपणांस माहिती आहे काय ?

ग्राहक दर्पण :-

वीज ग्राहका जागा हो. १०.

विद्युत ग्राहकांनो हे आपणांस माहिती आहे काय ?



१) सर्व प्रकारच्या विद्युत जोडणीसाठी अर्जाचे नमुने विद्युत पुरवठा कंपनीच्या कार्यालयामध्ये विनामुल्य मिळणे आवश्यक आहे आणि ऑनलाईन ही उपलब्ध आहेत. 

२) फर्म कोटेशनप्रमाणे रक्कम ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. या मुदतीत ग्राहकाने सदर कोटेशन भरले नाही तर सदरची मुदत संबंधित कार्यालयात पूढील ३० दिवसांसाठी वाढवून मिळू शकते.

३) विद्युत कनेक्शनसाठी अनामत रक्कम भरलेल्या ग्राहकांची अद्यायावत प्रतिक्षा यादी ग्राहकांना आवश्यकता असल्यास पाहण्यासाठी ऑनलाईन उपलब्ध केली आहे. सदर प्रतिक्षा यादी क्रमबद्ध प्रमाणेच कनेक्शन देणे विद्युत पुरवठा करणा-या कंपनीस बंधनकारक आहे.

४) विद्युत कनेक्शनसाठी आवश्यक असलेली सर्व साहित्याची रक्कम फर्म कोटेशनमध्ये ग्राहकाकडून घेत असल्याने सर्व साहित्य विद्युत पुरवठादाराने पुरविणे आवश्यक आहे.

५) नैसर्गिक आपत्ती किंवा वायरचे आयुष्यमान कमी झाल्यामुळे किंवा सदोष साहित्यामुळे ग्राहकांची सर्व्हिस वायर बदलणे किंवा आवश्यक असल्यास विद्युत पुरवठा कंपनीकडून विनामुल्य बदलून मिळू शकते.

६) लाईट बिल भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वी २१ दिसव आधी लाईट बिल ग्राहकांना मिळणे आवश्यक आहे.

७) सरासरी पद्धतीने किंवा रीडींग न घेता दोन किंवा तीने बिले आली असल्यास टप्पा पद्धतीची (स्लॅब बेनिफीट) सवलत संबंधित ग्राहकाला मिळणे आवश्यक आहे.

८) लाईटबिल हरविले खराब झाले किंवा अन्य कारणामुळे चालू लाईटबीलाची दुय्यम प्रत संबंधित कार्यालयात एक रुपया शुल्क भरुन मिळू शकते.

९) विद्युत पुरवठा कंपनीकडे ग्राहकांनी कनेक्शन घेतेवेळी भरलेल्या सुरक्षा ठेवीच्या अनामत रक्कमेवर व्याज देणे बंधनकारक आहे. असे व्याज वर्षातील कोणत्याही एका बीलामध्ये जमा दाखविले आहे काय याची खात्री करावी.

१०) विद्युत पुरवठ्यासाठी मागणी केल्या प्रमाणे कोटेशन भरल्यानंतर ग्राहकाने कनेक्शन घेतल्यास विद्युत पुरवठ्यासाठी कंपनीचा जर काही खर्च झाला असल्यास तो खर्च वजा करुन राहीलेली रक्कम अनामत रक्कमेबरोबर ग्राहकास परत मिळू शकते.

११) भारतीय विद्युत कायद्याचे २६ व्या कलमानुसार विद्युत वापराची योग्य पद्धतीने व बरोबर मोजणी करण्यासाठी अचुक व दोषरहीत मीटर बसविणे हे विद्युत पुरवठा कंपनीचे कर्तव्य आहे. सेवेचा दर्जा व सेवा देण्याची एखाद्या कायद्यानुसार व करारानुसार ठरलेली विशिष्ट पद्धती ज्यामध्ये दोष कमतरता आढळल्यास त्याला "सेवेतील त्रुटी / न्युनता म्हणता येईल. असा निकाल दि. ११/७/९५ रोजी राजस्थान राज्य ग्राहक आयोगाने दिला आहे. सर्व जबाबदारी ग्राहकांची आहे असे विद्युत कंपनीचे अधिकारी सांगू शकत नाही.

१२) विद्युत बीलाच्या थकबाकीवर विद्युत पुरवठा कंपनीकडून द.सा.द.शे. १८% इतके व्याज आकारण्यात येते. त्यामुळे नियमितपणे विद्युत बिलाचा भरणा करणे ग्राहकांच्या अधिक हिताचे आहे.


आपला स्नेहांकित ग्राहक हितार्थ सेवक,

अजय भोसरेकर,

मा. अध्यक्ष, (विद्युत)

ग्राहक तक्रार निवारण मंच,

क्रमशः -१०..... धन्यवाद.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.          ✍️Ddbatmi@m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.