अभाविप अधिवेशनाचे पोस्टर अनावरण सोहळा
अभाविप अधिवेशनाचे पोस्टर अनावरण सोहळा
मूल,डीडीन्यूजब्यूरो
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५३वेअधिवेशन नागपूर येथे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात २८,२९,३० जानेवारी रोजी होऊ घातले आहे.
त्यानिमित्ताने मूल शाखेतर्फे दिनांक २०जानेवारी ला दीपक देशपांडे , किशोर कापगते, सहारेजी , डॉ. खुशाल राठोड , प्रविण मोहूर्ले, विपीन भालेराव , प्रजोत रामटेके, सुजय शेंडे यांच्या हस्ते अधिवेशनाच्या पोस्टर चे अनावरण करण्यात आले.
उपस्थित सर्वानी विद्यार्थ्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती सादर करताना आजचा विद्यार्थी हा उद्याचा नाही तर आजचाच विद्यार्थी नागरिक असल्याने त्यांना आपली जबाबदारी कळावी व तो इतर विषयांच्या आहारी न जाता अभ्यास करताना स्वतः ची जबाबदारी व कर्तव्ये समजून समाजात वावरु शकला पाहिजे, यासाठी या अधिवेशनात विचारमंथन होणार असून विद्यार्थी संघटना वाढविण्यासाठी हा प्रयत्न सुरू असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
आजच्या दिवशी पत्रकार तथा ग्राहक चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते दीपकजी देशपांडे यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी लोकेश मडावी ,ओम गिरडकर ,तेजस रणदिवे आणि जिल्हा संघठन मंत्री ऋतीकजी कनोजिया तसेच स्र्थानिक विद्यार्थी कार्यकर्ते चिकू चौखुडे ,शाम धानोरे ,भूषण हावरे ,दशरथ वानखडे ,सौरभ पातोंड,समय उपरीकर व विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
.दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment