रासे योजना शिबिराचा समारोप!

मारीया महाविद्यालय मूलच्या टेकाडी येथील  राष्ट्रीय सेवा योजनेचा समारोप!

ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ग्राहक संरक्षण अधिनियम आणि त्यातील तरतुदी समजून घेण्याची आवश्यकता -दीपक देशपांडे.



मूल :डीडीन्यूजब्यूरो.

मारिया महाविद्यालय मूल तथा ग्रामपंचायत, टेकाडी यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालय स्तरीय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने  दि. १७ जानेवारी २०२५ ते २३ जानेवारी २०२५ या सात दिवसीय शिबिराचे आयोजन मूल तालुक्यातील टेकाडी येथील जि.प.शाळा टेकाडी येथे  यूथ फॉर माय भारत’ या संकल्पनेवर विविध उपक्रम टेकाडी येथे घेण्यात आले होते.

या महाविद्यालय स्तरीय शिबिरा मध्ये विद्यार्थ्यांना देशाबद्दल व समाजाबद्दल त्यांच्या मध्ये जागरूकता निर्माण व्हावी. त्यांच्यामध्ये असलेल्या कला गुणांना वाव मिळावं यासाठी याराष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन केलेले होते .
याचाच एक भाग म्हणून आज दिनांक २२/०१/२०२५रोजी  जागृत ग्राहक राजा या ग्राहक संघटनेचे वतीने विद्यार्थी ग्राहक जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,या कार्यक्रमात संघटनेचे सचिव रमेश डांगरे यांनी ग्राहक म्हणजे काय? आणि ग्राहक फसवणुकीच्या प्रकाराबाबत माहिती दिली तर संघटनेचे अध्यक्ष दीपक देशपांडे यांनी ग्राहक, ग्राहक संरक्षण अधिनियम आणि त्यातील तरतुदी व फसवणूक प्रकारांची माहिती देताना पदोपदी होणारी फसवणूक टाळण्यासाठी  ग्राहक संरक्षण अधिनियम पारित होऊन ३८ वर्षै लोटून गेली तरीही याबाबत पाहिजे तशी जागरुकता झाली नाही म्हणून ग्राहक जागृतीची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले,व जागो ग्राहक चा नारा घरोघरी पोहचवणे हे उद्दिष्ट ठेवून आम्ही हे ग्राहक जागृतीचे शस्त्र हाती घेतले आहे असे पटवून दिले.यानंतर समारोपीय कार्यक्रम पार पडला.
यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ भास्कर सुकारे यांचे अध्यक्षतेखाली, उद्घाटक, डॉ.मर्लिवार, प्रमुख अतिथी म्हणून जागृत ग्राहक राजा संघटनेचे दीपक देशपांडे, प्रा.देशमुख, राजेश सावरकर, मुख्याध्यापक देवनील विद्यालय टेकाडी, रमेश डांगरे सचिव,जागृत ग्राहक राजा मूल ,अरुण जराते,अध्यक्ष,शाळा शिक्षण समिती, प्रमोद बोमनवार ,पोलिस पाटील टेकाडी, प्रा.प्रफुल्ल निरुडवार कार्यक्रम अधिकारी रासेयो. प्रा.गितांजली मशाखेत्री  आदी मान्यवर उपस्थित होते.  
ग्राहक प्रबोधनानंतर समारोपीय कार्यक्रम पार पडला , यावेळी साप्ताहिक शिबिरात घेतलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आढावा घेतला गेला आणि गावकरी व शिबिरार्थी यांच्यातील चर्चेतून अनेक प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न केला गेला डाॅ.मर्लावार यांनी विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमातून ग्रामीण भागातील जनजीवन त्यांचे राहणीमान,व त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यावर योग्य ते विश्लेषण करण्याचा मौलिक विचार पुढे ठेवला.

  या शिबिरामध्ये सकाळी ५ वाजता पासून ते रात्रो १० वाजता पर्यंत दिवसभरामध्ये दैनिक कार्यक्रम पार पडतात, त्यामध्ये प्रामुख्याने जागर, प्रार्थना, व्यायाम, योगा, अल्पपोहार, चहा, श्रमसंस्कार, भोजन, बौद्धिक सत्र कार्यक्रम, विविध खेळ स्पर्धा, प्रार्थना, अहवाल वाचन सांस्कृतिक कार्यक्रम अशाप्रकारे दिनचर्या असते.
  राष्ट्रीय सेवा योजना महाविद्यालय स्तरीय विशेष शिबिराचे उद्घाटन दि. १८ जानेवारी २०२५ रोज शनिवारला दुपारी २ वाजता पार पडले या उ‌द्घाटन कार्यक्रमाचेअध्यक्ष स्थानिक टेकाडी ग्रामपंचायतचे सरपंच सतीशजी चौधरी हे  होते तर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून डॉ. ए. चंद्रमौली रा. म.गा. महाविद्यालय सावली होते, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अनिता वाळके कर्मवीर महाविद्यालय, मूल तसेच गावातील तंटामुक्त समिती अध्यक्ष बंडूजी गोहणे, पोलीस पाटील प्रमोदजी बोमनवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरुणजी जराते, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी गावातील सर्व पदाधिकारी व सर्व व ग्रामस्थ, शिबिरार्थी विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या  संख्येने उपस्थित होते.
या शिबिराचे प्रास्ताविक मारिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर सुकारे यांनी केले, या कार्यक्रमाचे संचालन प्रा. गीतांजली मशाखेत्री यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रफुल निरुडवार यांनी केले.


दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.