लक्षवेधी:-७ ,सरकारी सर्वेक्षणाची एक अनोखी शक्कल?

 लक्षवेधी:-७

सरकारी सर्वेक्षणाची एक अनोखी शक्कल?



दीपक देशपांडे 

खरीप हंगाम २०२४-२५मध्ये निसर्गाच्या कोपामुळे अतीवृष्टि झाली आणि तलाठी ,ग्रामसेवक यांना नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांच्या याद्या तातडीने सादर करण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या, परिणामी तलाठी व ग्रामसेवक यांनी कुठे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तर कुठे घरी बसूनच या याद्या तयार केल्याचे वास्तव पुढे येऊ लागले आहे.

शासकीय आदेशाचे पालन करायचे म्हणून या शासकीय नौकरदारांनी कुठे पावसापाण्यात शेतकऱ्यांच्या बांधावर  नाममात्र भेट दिली  परंतू याद्या पाहिल्यावर मात्र घरी बसूनच तयार केल्या किंवा जून्याच याद्यांच्या प्रती काढून नव्याने सादर केल्याचा आरोप होऊ लागला आहे.

नाहीतर या याद्यांमध्ये सलगच्या चार शेतकऱ्यांपैकी कुठे एकाचे तर कुठे दोघांचे नाव सुटण्याचे काही कारण नसावे , किंवा आजूबाजूच्या सगळ्या शेतकऱ्यांची नावे असतांनाच एखाद्याचे नाव सुटण्याचे ही काही कारण नसावेच पण या याद्या पाहिल्यावर सरळसरळ ही बाब लक्षात येते आणि म्हणूनच शेतकऱ्यांचा हा आरोप वास्तवता प्रदर्शित करतो,व या याद्यांमध्ये हेतेपुरस्सर काही नावे वगळण्यात आली तर काही नावे नुकसानीची कोणतीही झळ न पोहोचता ही जोडली गेल्याचे वास्तव पुढे येऊ लागले आहे. आणि म्हणूनच या याद्या आणि केल्या गेलेल्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वास्तविक शासनाकडे बुडीत क्षेत्राचे सगळे रेकार्ड  सेटलाईट चित्रांद्वारे उपलब्ध असताना काही शेतकरी या क्षेत्राच्या बाहेर असूनही त्यांची नावे या यादीत कशी समाविष्ट करण्यात आली आणि प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कां वगळण्यात आले याची चौकशी केली गेली तर ह्यातील वास्तव पुढे यायला वेळ लागणारच नाही.

मात्र काही प्रमाणात हा प्रकार प्रत्येक गावात घडला असल्याचे हळूहळू स्पष्ट होत असून यादीत नाव नाही म्हणून तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे नंतरच्या यादीत कशी समाविष्ट केली जात आहेत ही न समजण्यासारखी बाब आहे तर तक्रार न करणारे या लाभापासून कायमच वंचित राहणार आहेत, कारण प्रत्यक्ष मोक्काचौकशी केल्याचे तलाठी व ग्रामसेवक मोठ्या अभिमानाने सांगत आहेत. 

जर मोक्काचौकशी केली तर मोक्यावर कदाचित शेतमालक त्यावेळी हाजर नसेलही परंतू सोबतची गावातील मंडळी शेत कुणाचे यांची तर योग्य माहिती देतीलच ना?मग तरीही काही नावे यादीत येतात तर काही यादीतून वगळण्यात येतात हा प्रकार कसा घडू शकतो ?हा प्रश्न लक्षवेधी साठी आमच्या पुढे आला ,यांची खातरजमा करून आम्ही हा प्रश्न लक्षवेधी साठी उचलून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी ही यादी शासनाकडे पाठविण्यापूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात चावडीवर वाचन करुन मंजूर करुन शासनाकडे पाठविण्यात यावी ह्या ग्रामस्थांच्या मागणीत दम असल्याचे स्पष्ट होत असून शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी अत्यावश्यक बाब असल्याचे आढळून आले आहे.

लक्षवेधी घ्या माध्यमातून शासकीय सर्वेक्षण केल्यानंतर तयार करण्यात आलेल्या यादीचे ग्रामपंचायत कार्यालयात चावडी वाचन केल्याशिवाय ती यादी मंजूर करण्यात येवू नये अशी मागणी परिसरातील  असंख्य ग्रामस्थांसोबतच आम्ही एक नागरिक,एक शेतकरी ,एक ग्राहक , एक ग्राहक चळवळीतील कार्यकर्ता म्हणून सामाजिक  दायित्व  जपताना Ddbatmi@m2M चे माध्यमातून करीत आहोत.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.             ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.