लक्षवेधी:-१० विद्यार्थ्यांनी व्यसनाधीनता टाळावी , असं म्हणायची वेळ कां यावी?

 लक्षवेधी:- १०

विद्यार्थ्यांनी व्यसनाधीनता टाळावी प्रत्येकाने करिअर कडे लक्ष द्यावे- असं म्हणायची वेळ कां यावी?



दीपक देशपांडे 

 समाजात व्यसनाधीनता वाढत असून यात तरुण पिढीही गारद होत असतानाच विद्यार्थीही नशेच्या आहारी जात असल्याचे वास्तव आहे. ही चिंतनीय बाब असून विद्यार्थ्यांनी व्यसनाधीनता टाळावी प्रत्येकाने आपापल्या करिअर कडे लक्ष द्यावे. ध्येय ठरवून त्या ध्येयाचा पाठलाग करावा व यश संपादन करावे विद्यार्थ्यांनी नशाच करायची असेल तर ध्येयाची नशा करावी, असे प्रतिपादन मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांनी भेजगाव येथील शरदचंद्र पवार  विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात परिवहन समितीच्या बैठकीदरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.

                 सदर कार्यक्रम सोमवार दि. १३ रोजी दुपारी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या भारती मोटघरे तर विशेष मार्गदर्शक म्हणून पोलीस निरीक्षक सुमित परतेकी, पोलीस उपनिरीक्षक उत्तम कुमरे, पोलीस पाटील शशिकांत गणवीर, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रवींद्र शेट्टे आदी मंचावर उपस्थित होते. ठाणेदार सुमित परतेकी यांनी पुढे बोलताना वाहतुकीचेनियम सांगत ते पाळत अपघात टाळण्याचे आवाहन केले. तर विकृत मानसिकता व त्यातून उद्भवणारी गुन्हेगारी प्रवृत्ती ही समाजाला लागलेली कीड असून याचा समूळ उच्चाटनासाठी लोकसहभागातून सामाजिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. 

कार्यक्रमाचे यशस्वी संचालन श्रावण बोरकर तर प्रास्ताविक अरविंद जेंगठे तर आभार  प्रदर्शन प्रकाश जमदाळ यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. एक चांगला उपक्रम असा याचा उल्लेख करता येईल पण.........

या आशयाची बातमी प्रसिद्ध झाली आणि आमच्या काही हितचिंतकांनी आमच्यापुढे हा प्रश्न लक्षवेधी साठी पाठविला आणि मागणी केली,की याविषयावर आम्ही काही , लिहावे आणि लक्षवेधीतून  काहीतरी सुचवावे ......!

खरेतर त्या प्रश्नातचं तर याचे उत्तर लपले आहे , कायद्याचे रक्षण करणारेच ही भाषा वापरु लागले  की शंका येतेच पण कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांचा धाक आणि कायद्याची भितीच जर नागरिकांना उरली नसेल आणि अशा व्यसनाधिनतेकडे आपलेच भाऊबंद ओढले जात असताना समाज निमूटपणे सहन करत असेल तर....... !

याबाबत कुणा एकाची चूक आहे असे कुणी म्हणूच शकत नाही पण *"मला काय त्याचे"*ही आपल्या समाजात वाढत जाणारी वृत्ती आणि अशा प्रकारांना लाभत असलेले राजकीय पाठबळ हेच याचे प्रमुख कारण मानता येणार नाही का? समाजाच्या भवितव्यासाठी याबाबत विचारमंथन होणे गरजेचे आहे.

त्यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची , गावातील समस्या सोडविण्यासाठी गावातच त्याचा निर्णय लावून त्याची कठोर अंमलबजावणी करण्याची तरतूद करण्यात आली पाहिजे.

पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेने यासाठी अराजकीय समितीचे माध्यमातून गावकमेटीची स्थापना करुन त्यावर विश्वास ठेवला पाहिजे, (आज अस्तित्वात  असणाऱ्या राजकीय लोकांना नियुक्तीने देऊ केलेले पदभार नाही तर ग्रामस्थांनी सर्वसंमतीने  निवडलेल्या  समाजातील चांगल्या लोकांची कमेटी) गावागावात ही चळवळ उभी राहिली पाहिजे , त्यासाठी समाजातील सुशिक्षित वर्गाने ही पुढाकार घेऊन पुढे आले पाहिजे,तर आणि तरच यावर अंकुश लावता येऊ शकतो,अन्यथा आजच्या स्थितीत शासन शासकीय तरतुदी , कायदे, कायद्यातील तरतुदी व पळवाटा यांमुळे फारसा काही फरक पडणार नाही हे समजून घेण्याची आवश्यकता आहे.

बघा पटलंच तर....पण हा विषय लक्षवेधी असून यावर सर्व समावेशक विचारमंथन होणे अत्यंत गरजेचे आहे , आणि यंत्रणांकडून कायद्याचा अंमल होणेही आवश्यक आहे. एक दिवसाच्या चर्चेतून या विषयावर निष्कर्ष काढला जाणे अशक्यच आहे ,हे पटवून देणे गरजेचे आहे.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.          ✍️Ddbatmi@m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.