लक्षवेधी:-१२ बसमध्ये जागा असतानाही बस वाहकाने बस थांबवलीच नाही.

 लक्षवेधी १२.

बस, बसस्थानक,वाहकाची मनमानी, खाजगी बस वाहतूक आणि डोळे मिटलेली प्रशासकीय यंत्रणा!

जागृत ग्राहक राजा,या ग्राहक संघटनेचे निवेदन.

बसमध्ये जागा असतानाही बस वाहकाने बस थांबवली नाही.वयोवृद्ध नागरिकांना नाहक त्रास, कार्यवाही करीत समज देण्याची मागणी.



मूल,दीपक देशपांडे 

मूल बसस्थानक हे चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण असून येथून चारही दिशांना प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करीत  असतात. यादरम्यान बसेस नियोजित जागेवर न लागणे ,वेळेवर न येणे  यांसारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते , चौकशी करायला गेल्यानंतर योग्य मार्गदर्शन न करणे बसस्थानकावर नियंत्रकांजवळ तक्रार पुस्तक नसणे किंबहुना असूनही ते उपलब्ध करून न देणे असे प्रकार तर नित्याचेच झाले आहेत.

मात्र मंगळवार दिनांक २१जानेवारी२०२५ रोजी दुपारी तुमसर डेपो ची चंद्रपूर तुमसर बस  क्रमांक  ५८०४ नियोजित वेळेपेक्षा उशीराच मूल बसस्थानकावर पोहोचली  , बऱ्याच वेळा पासून प्रतिक्षा करीत असणारे एक वयोवृद्ध जोडपं या बसची वाट बघत बसस्थानकावर बसले होते ,ती बस उशीरा आली , त्यामुळे बस शोधत त्या बसपर्यंत ते जोडपे जाऊन पोहोचले , परंतु षस वाहकाने काहीही विचार न करताच ती बस सोडुन दिली. त्यांचे सोबत असणाऱ्यांनी बसस्थानक परिसरात नियंत्रकांना हा प्रकार सांगितला ्व तक्रार पुस्तिकेची मागणी केली ,मात्र बसस्थानक नियंत्रकांनी जूनी तक्रार पुस्तिका फाटल्याने ती परत पाठविली आहे असे उत्तर देत नवीन तक्रार पुस्तिका अजून प्राप्त व्हायची आहे असे सांगितले ,व तक्रार लेखी दिलीत तर मी ती जिल्हा कार्यालयात पाठवून देईन असे स्पष्ट केले. यावेळी जागृत ग्राहक राजा संघटनेचे सचिव बसस्थानकावर उपस्थित होते, त्यांनी हा प्रकार बघितल्यावर याबाबत तक्रारकर्त्यांची बाजू समजून घेऊन जागृत ग्राहक राजा संघटनेकडे यासंबंधीची सविस्तर माहिती दिली आणि तक्रारीची प्रत सादर केली असता जागृत ग्राहक राजा संघटनेचे माध्यमातून आगार व्यवस्थापक चंद्रपूर व तुमसर यांचे नांवे एक-एक तक्रार अर्ज सादर करीत सहपत्र म्हणून अर्जदारांची तक्रार जोडून  संबंधित बस वाहकांवर कठोर कारवाई करीत यापुढे असे प्रकार होणार नाहीत यासाठी काळजी घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

जागृत ग्राहक राजा संघटनेच्या वतीने यापूर्वी सुद्धा बसस्थानकावर प्रवाशांना आवश्यक सुविधा उपलब्ध नसणे , बसस्थानक परिसरात दुर्गंधी येणे, बसेसची अनियमितता , विद्यार्थ्यांशी वाहकाने उर्मटपणे  वागणे, पाण्याची सोय ,मुत्रिघराची अस्वच्छता , बसस्थानका-समोरच खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे थांबे आणि प्रवासी भरण्यासाठी बसस्थानक परिसरात जोरजोराने आवाज देऊन प्रवासी घेऊन जाणे ,खाजगी वाहनांमुळे रस्त्यावर अनावश्यक गर्दी जी टाळता येऊ शकते ती टाळावी यासाठी प्रयत्न करण्यात आले असून त्यात बऱ्यापैकी यशही मिळाले होते मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या  ढिसाळ कारभारामुळे काही दिवसांतच हे नाट्य संपून पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण केली जाते. शेवटी कुणालाच बसस्थानकासमोर उभी राहणारी खाजगी वाहने आणि त्यामुळे होणारी गर्दी कशी दिसून येत नाही हा तर गंभीर प्रश्न असल्याचे मत यानिमित्ताने या परिसरातील छोटेमोठे व्यावसायिक आणि प्रवाशांनी व्यक्त केले, आणि आमच्या मागणीची कुणीतरी दखल घेणार आहे ,ही आनंदाची बाब असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली.

जणुकाही या बसस्थानकावर कुणाचेच नियंत्रण नाही  ही स्थिती बदलण्यासाठी पोलिस ,प्रशासन , वाहतूक नियंत्रण शाखा आणि बसस्थानक नियंत्रकांनी संयुक्त कारवाई करण्याची मागणीही जागृत ग्राहक राजा संघटनेचे वतीने करण्यात आली आहे.

आम्ही संवाद समन्वयातून ,सहकार्याचा मार्ग अवलंबून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करतो असे जागृत ग्राहक राजा ग्राहक संघटनेचे पदाधिकारी यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत चर्चा करताना स्पष्ट केले. तर महामंडळाच्या वाहकाने ह्या प्रवाशांना बसमध्ये घ्यायला हवे होते असे मत बसस्थानक नियंत्रक नागनाथ  वाडिकर यांनी स्पष्ट केले आहे. परंतू बसवाहकाच्या एका चुकीने तासभरापासून प्रतिक्षेत असणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांना बसजवळ पोहोचून ही प्रतिक्षा करीत बसची धरसोड करीत पुढिल प्रवास करावा लागला ही बाब अत्यंत खेदजनक व चिड आणणारी आहे ,असे मत बसस्थानक परिसरात उपस्थित प्रवाशांनी व्यक्त केले ,व कंडक्टरच्या या मनमानी कारभारावर अंकुश लावणे आवश्यकच नाही तर गरजेचे असल्याचे मत उपस्थित प्रवाशांनी हृदयापासून सांगितले ,कारण हा प्रकार केवळ या एकाच बसबाबतीत नाही तर असे अनेक प्रकार वारंवार घडत असतात,मात्र तक्रार करायला कुणी फारसे धजत  नाहीत हेही स्पष्ट केले, आणि त्यामुळेच यांची अशी अरेरावी आणि असहकार्याची भावना दिसून येते ,असेही ते आपले मत मांडताना उल्लेखित करायला विसरले नाहीत.

एकुण निमित्त एक प्रश्न अनेक आणि त्यासाठी पर्याय एकच तो म्हणजे जागो ग्राहक जागो चा जागर करीत ग्राहकांना तक्रार करायला पुढे येण्याची गरज असल्याचे मत जागृत ग्राहक राजा संघटनेचे मूल तालुका सचिव रमेश डांगरे  यांनी व्यक्त केले.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️




Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.