भेजगाव येथे नि:शुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.

 भेजगांव येथे नि:शुल्क मोतीबिंदू व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.

सक्षम बहुउद्देशीय ग्रामविकास संस्था भेजगावचा पुढाकार.


दीपक देशपांडे मूल.

मूल तालुक्यातील भेजगाव येथे ३ जानेवारी २०२४ रोजी सावित्रीबाई फुले. यांच्या जयंतीनिमित्त सक्षम बहुउद्देशीय ग्रामविकास संस्था भेजगावच्या  पुढाकाराने व  समता फाऊंडेशन मुंबई आणि शालिनीताई मेघे हाॅस्पिटल व रिसर्च सेंटर नागपूर  यांचे सौजन्याने नि:शुल्क मोतीबिंदू व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात मोफत मोतीबिंदू तपासणी व आवश्यक  असल्यास  मोफत शस्त्रक्रिया करण्याबाबत माहिती देण्यात येणार आहे.

यासाठी लाभार्थ्यांना  तपासणी साठी येताना सोबत रेशन कार्ड व आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत सोबत आणावी लागणार आहे.

मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना शस्त्रक्रिया करण्यासाठी नेण्या आणण्याची तसेच जेवणाची सोय करण्यात येणार आहे.

या शिबिराचे आयोजन भेजगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या विशाखा श. गणवीर आणि शशीकांत गणवीर यांनी केले आहे.

या शिबिरात सहभागी होऊन प्राप्त संधीचा लाभ ग्रामीण भागातील जनतेने घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.            ✍️Ddbatmi@m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.