शेतकरी /ग्राहक राजा जागा हो.....२

  शेतकरी /ग्राहक राजा जागा हो.....२.



महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी प्रक्रिया उद्योगासाठी  सुवर्ण संधी 

दीपक देशपांडे 

२०२१-२०३० या दशकात होणार भारतीय कृषी प्रक्रिया क्षेत्राची उज्वल भविष्याकडे वाटचाल! 

खालीलपैकी कोणताही उद्योग करा आणि वैयक्तिक *सबसिडी १० लाख* व गटामार्फत *सबसिडी ३ कोटीपर्यंत* मिळवा.

केंद्र शासन सहाय्यीत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PM FME)

स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करणेसाठी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना जाहीर केली आहे या योजने अंतर्गत स्वतःचा प्रक्रिया उद्योग सुरू/विस्तार करण्यासाठी ३५% किंवा १० लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.

योजनेचे नाव :* प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PM FME)

पात्र लाभार्थी 

शेतकरी, युवक, उद्योजक, शेतकरी कंपन्या, शेतकरी बचतगट, महिला बचतगट, विविध कार्यकारी संस्था

योजने अंतर्गत समाविष्ट प्रक्रिया उद्योग

१.दूध प्रक्रिया : 

खवा, बर्फी, पेढे, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, ताक, दही, तूप, लस्सी इ.

२. मसाले प्रक्रिया : 

चटणी मसाला, कांदा-लसूण मसाला, मालवणी मसाला, मटण-चिकन मसाला, गोडा मसाला.

३. चटणी प्रक्रिया* :

 शेंगदाणा चटणी, खोबरे चटणी, कारळ्याची चटणी, जवसाची चटणी.

४. तेलघाणा प्रक्रिया :

 शेंगदाणा, सोयाबीन, सुर्यफुल, तीळ, बदाम व सर्व प्रकारची तेल उत्पादने.

५. पावडर उत्पादन प्रक्रिया:

 काश्मिरी मिरची, लवंगी मिरची, स्पेशल मिक्स, जवारी मिर्ची, धना, जिरा, गुळ, हळद इ.

६. पशुखाद्य निर्मिती: 

मक्का चुनी, गहू आटा, सरकी पेंड, गोळी पेंड, भरड धान्य इ.

७. कडधान्य प्रक्रिया: 

हरभरा व इतर डाळी(पॉलिश करणे), बेसन तयार करणे इ.

८. राईस मिल: 

चिरमुरे, तांदूळ, पोहा प्रक्रिया इ.

९. बेकरी उत्पादन प्रक्रिया : 

बिस्कीट, खपली गहू बिस्कीट, मैदा बिस्कीट, नानकटाई, क्रीमरोल, म्हैसूर पाक, केक, बर्फी, खारी, टोस्ट, ब्रेड, बनपाव, शेव, फरसाण, चिवडा, भडंग, केळी चिप्स, बटाटा चिप्स, फुटाणे, चिरमुरे इ. 

वरीलपैकी कोणताही उद्योग सुरू करण्यासाठी  संपर्क साधावा..* 

तालुका कृषी अधिकारी *कार्यालय किंवा गावचे कृषी सहाय्यक* 

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PM FME)*

या योजनेचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवा.

फळ, भाजीपाला आणि भरडधान्य (Millets) प्रक्रिया उद्योग संधी

डाळ मिल, बेसन मिल आणि मसाले उद्योग संधी

ऑरगॅनिक फूड प्रोडक्शन, सर्टिफिकेशन & एक्स्पोर्ट

ऑरगॅनिक फूड साठी देशांतर्गत# आणि आंतराष्ट्रीय बाजारपेठ

भारतीय कृषी क्षेत्राची उज्वल भविष्याकडे वाटचाल

भविष्यातील भारतीय कृषी

विविध कृषि प्रक्रिया उद्योगांची देशांतर्गत बाजारपेठ

कृषी प्रक्रिया उदयोगासाठी लागणाऱ्या मशिनरी आणि त्यातील गुंतवणूक

कृषी प्रक्रिया उद्योगाची स्थापना करताना कोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत?

कृषी प्रक्रिया उदयोग चालू करताना लागणाऱ्या विविध मान्यता कश्या मिळवाव्यात ?

कृषी प्रक्रिया उद्योगासाठी बँक प्रोजेक्ट (DPR) कसा असावा ?

आपल्या प्रोडक्टस साठी बाजारपेठ कशी शोधावी ?

कृषी प्रक्रिया उद्योगाचे यशस्वी व्यवस्थापन करण्यासाठी कोणत्या व्यावसायीक तत्वांचे पालन करावे?

कृषी प्रक्रिया उदयोगासाठी लागणाऱ्या शासकीय मान्यता

कृषी प्रक्रिया उद्योगांशी निगडित 

Ministry of Food Processing Industries (MoFPI), प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना* इ. च्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांच्या प्रति, कृषी प्रक्रिया उद्योगाच्या मॉडेल प्रोजेक्ट रिपोर्ट ची प्रत, बँक मंजुरी .

आवश्यक सहकार्य जिल्हा अधीक्षक  कृषी अधिकारी कार्यालय यांचे मार्फत DRP (जिल्हा संसाधन व्यक्ती)


दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.          ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.