ग्राहक दर्पण :- वीज ग्राहका जागा हो. ९.
ग्राहक दर्पण :-
वीज ग्राहका जागा हो. ९.
अन्य महत्वाच्या बाबी -
अन्य महत्वाचे आदेश, तरतुदी व माहिती
1. प्रॉम्प्ट पेमेंट डिस्काउंट (त्वरीत भरणा सवलत) - विद्युत बिल, बिल दिनांकापासून ७ दिवसांचे आत भरल्यास ग्राहकास विद्युत आकारामध्ये १% सवलत मिळेल. मुदतीत ऑन लाईन भरणा (digital payment) केल्यास अतिरीक्त सवलत ०.२५% मिळू शकेल.
2. उपसा सिंचन योजना- उपसा सिंचन योजना (लिफ्ट इरिगेशन स्कीमस) ना किमान १६ तास वीज पुरवठा करावा असे आदेश मा. आयोगाने दि. १८/०५/२००७ अन्वये दिलेले आहेत. तथापि त्यासाठी अशा योजना असलेले फीडर्स वेगळे करणे अथवा गावठाण फीडर्सना जोडणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित कार्यालयाकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
आपला स्नेहांकित ग्राहक हितार्थ सेवक,
अजय भोसरेकर,
मा. अध्यक्ष, (विद्युत)
ग्राहक तक्रार निवारण मंच,
क्रमशः ९....
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment